Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

06/10/2026

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बाळासाहेब थोरात, अमोल खताळ यांच्यासह १६ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात, शिवसेनेत बंडखोरी… वंचित, मनसेच्या उमेदवाराचाही समावेश; आता लक्ष रणछोडदासांकडे…
निवडणूक

बाळासाहेब थोरात, अमोल खताळ यांच्यासह १६ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात, शिवसेनेत बंडखोरी… वंचित, मनसेच्या उमेदवाराचाही समावेश; आता लक्ष रणछोडदासांकडे…

माघारी नंतर चित्र स्पष्ट होणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, २९ ऑक्टोबर

संगमनेर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसाखेर १६ उमेदवारांनी २४ अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शैलेंद्र हिंगे यांनी दिली.

उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये महाविकास आघाडी कडून विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात, महायुतीकडून अमोल खताळ, वंचित बहुजन आघाडीचे अजीज व्होरा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे योगेश सूर्यवंशी या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे.

महायुतीकडून संगमनेरची जागा मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेला सोडण्यात आली असून या जागेवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक अमोल खताळ यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या विठ्ठल घोरपडे यांनी बंडखोरी केली आहे.

नगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीच्या घोषणेने राज्यभरात हाय व्होल्टेज ठरलेल्या या निवडणुकीत ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. विखे पाटील खरंच निवडणूक लढविणार का याविषयी गेल्या अनेक दिवसांपासून संगमनेरमध्ये तर्कवितर्क सुरू होते. राजकीय विश्लेषकांच्या मते सुजय विखे निवडणूक लढविणार नाही हा अंदाज वर्तवला जात होता, तो अखेर खरा ठरला आहे.

मोठ्या हौसेने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तो माघारीपर्यंत काढून घेत निवडणुकीचे मैदान सोडणाऱ्या रणछोडदासांकडे आता लक्ष लागले आहे. १६ पैकी किती उमेदवार निवडणुकीतून माघार घेतात हे देखील लवकरच स्पष्ट होणार आहे.

संगमनेर विधानसभा मतदारसंघातून दाखल झालेले अर्ज पुढील प्रमाणे…

  1. भागवत धोंडीबा गायकवाड (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक)
  2. अब्दुल अजीज अहमद शरीफ व्होरा (वंचित बहुजन आघाडी)
  3. अजय गणपत भडांगे (अपक्ष)
  4. सूर्यभान बाबुराव गोरे (बहुजन समाज पक्ष)
  5. विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात (इंडियन नॅशनल काँग्रेस)
  6. शशिकांत विनायक दारोळे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए))
  7. भारत संभाजी भोसले (समता पार्टी)
  8. विठ्ठल रावसाहेब घोरपडे (अपक्ष)
  9. दत्तात्रेय रावसाहेब ढगे (अपक्ष)
  10. अल्ताफ इब्राहिम शेख (अपक्ष)
  11. अविनाश हौशीराम भोर (जयहिंद जयभारत राष्ट्रीय पार्टी)
  12. कलीराम भैरू पोपळघट (भारतीय नवजवान सेना)
  13. रभाजी गिरजी खेमनर (राष्ट्रीय समाज पक्ष)
  14. अमोल धोंडीबा खताळ (शिवसेना)
  15. प्रदीप विठ्ठल घुले (लोकशाही पार्टी)
  16. योगेश मनोहर सूर्यवंशी (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,655
उमेदवारी अर्ज विधानसभा निवडणूक संगमनेर विधानसभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

By Annant Ppangarkar06/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहर व परिसरातील गरीब, गरजू आणि होतकरू युवक-युवतींना पोलीस भरतीसाठी…

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026

​’माझी फसवणूक झालीये…’; व्हिडिओ बनवून संगमनेरातील बेकरी चालकाच टोकाच पाऊल; शहरात खळबळ

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.