Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कोट्यावधीचे घबाड लागले तपासणी पथकाच्या हाती… सोने, चांदी, डायमंडचा समावेश
गुन्हेगारी

कोट्यावधीचे घबाड लागले तपासणी पथकाच्या हाती… सोने, चांदी, डायमंडचा समावेश

अहिल्यानगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक आचारसंहिता काळातील सर्वात मोठी कारवाई
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/11/2024Updated:01/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, ०१ नोव्हेंबर

निवडणूक आचारसंहिता काळात अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर-पुणे मार्गावरील सुपे टोल नाक्यावर पथकाला कोट्यावधी रुपयांचे घबाड हाती लागले. प्राथमिक माहितीनुसार पथकाला आढळून आलेल्या सोने, चांदी, डायमंड, दागिन्यांची किंमत २३ कोटी ७१ लाख ९४ हजार रुपये आहे.

गुरुवारी पुणे मार्गावरील सुपा टोल नाक्यावर निवडणूक आयोगाचे अधिकारी, तपासणी पथक व सुपा पोलिसांनी ही एकत्रित कारवाई केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्या नगर जिल्ह्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. कारवाई दरम्यान पकडण्यात आलेला ऐवज कोषागारात ठेवण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता अहिल्यानगर-पुणे महामार्गावरून पुण्याहून अहिल्यानगर मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे बीबीसी लॉजिस्टिक कुरिअर कंपनीची बोलेरो व्हॅन जात होती. ही व्हॅन सुपे टोल नाक्यावर आले असता तेथील तपासणी पथकाने ती अडविली. या चार चाकी वाहनाची पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात सोने, चांदी आणि डायमंड आढळून आले.

दागिने घेऊन जाणारे वाहन छत्रपती संभाजी नगरला जाणार असल्याची माहिती पथकाला वाहनातील व्यक्तींनी दिली. या व्यक्तीकडे आढळलेल्या बिलानुसार चार चाकी वाहनात ४ कोटी ९७ लाख रुपयांचे सोने व चांदीचे दागिने असल्याचे सांगण्यात आले.

मात्र निवडणूक अधिकारी, सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड, आयकर अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यात या चार चाकी वाहनात बिला पेक्षा जास्त किमतीचे सोन्या-चांदीचे तयार दागिने, चांदीच्या विटा व डायमंड आढळून आले. वाहनातील व्यक्तींकडे असलेले बिले आणि प्रत्यक्षात आढळलेल्या सोन्या-चांदीचे दागिने यात मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली.

रात्री उशिरापर्यंत इन कॅमेरा या सर्व मुद्देमालाची तपासणी, मोजमाप सुरू होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, डी वाय एस पी संपत भोसले, सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड, पारनेर आचारसंहिता पथकाचे प्रमुख दयानंद पवार, अशोक मरकड, स्थायीपथक प्रमुख माधव गाजरे, वैभव पाचरणे, हवालदार दरेकर, श्रीकृष्ण साळवे, फोटोग्राफर हारदे, आयकर अधिकारी आणि सोने, चांदीचे मोजमाप करणारे अधिकारी उपस्थित होते.

अशी होते दागिने, जडजवाहिरांची कायदेशीर वाहतूक…

निवडणूक आचारसंहिता काळात सोने आणि पैशाची वाहतूक करणार्‍या कंपन्यांना वाहतुकीचा मार्ग (रुट) ठरवून दिलेला असतो. तसेच संबंधित वाहनाकडे मार्ग (रुट) परवाना देण्यात आलेला असतो. तसेच संंबंधित वाहनांवर विशिष्ट बारकोड असतो. यामुळे संबंधित वाहनातील सोने आणि चांदी यासह पैसे अधिकृत असल्याचे समजण्यात येते. मात्र पथकाने सुपा टोल नाक्यावर पकडलेल्या चारचाकी वाहनाकडे यातील कोणतीच कागदपत्रे नव्हती. तसेच गाडीला संरक्षण देखील नसल्याने चाणक्ष अधिकार्‍यांच्या ही बाब लक्षात आली आणि गाडीची तपासणी करण्यात आल्यानंतर कोट्यवधीचे घबाड हाती आले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,217
निवडणूक आचारसंहिता पथक कारवाई विधानसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने…

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.