
शुक्रवार, ०१ नोव्हेंबर
संगमनेर – संगमनेरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्याच्या अनुषंगाने नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी शुक्रवारी एक मोठे विधान केलं आहे. यावर्षीची दिवाळी अतिशय साध्या पद्धतीने साजरी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

या संदर्भात ट्विट करत त्यांनी सविस्तर भूमिका मांडली केसेस कोणत्याही ‘मेडल’पेक्षा कमी नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ट्विटमध्ये आमदार तांबे नेमकं काय म्हणाले वाचा…
संगमनेर येथे घडलेल्या घटनेनंतर खोट्या गुन्ह्यांमध्ये माझ्या ५० हून अधिक सहकाऱ्यांना विनाकारण गुंतवले, दिवाळीसारख्या महत्वाच्या सणात ते सहकारी मित्र घरी राहू शकत नाहीत यापेक्षा मोठे दुःख माझ्या मनात नाही व त्यामुळेच ही दिवाळी अतिशय साध्या पध्दतीने साजरी करण्याचे मी ठरविले आहे.
राजकीय कार्यकर्त्यांसाठी आंदोलने, केसेस, जेल ह्या गोष्टी नवीन नाहीत, किंबहुना माझ्यासारख्या संघटनेतून पुढे आलेल्या कार्यकर्त्यांना तर ह्या केसेस कोणत्याही “मेडल”पेक्षा कमी नाहीत. माझ्यावर स्वतःवर अनेक राजकीय केसेस दिल्लीपासून मुंबईपर्यंत होत्या, त्यामुळे केसेस व जेल याला आम्ही भीत नाही. पण खोटे गुन्हे व पोलीस यंत्रणेमार्फत त्रास देणे हे चुकीचे आहे व त्याचे वाईट वाटतंय. माझ्या सर्व वीर सहकारी मित्रांना माझ्या सलाम !
https://x.com/satyajeettambe/status/1852196735839309830?s=19





