

शनिवार, ०२ नोव्हेंबर
संगमनेर बस स्थानकातील व्यापारी गाळे बऱ्याचदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. संबंधित ठेकेदार, एसटी महामंडळाचे अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे व्यापारी गाळ्या बाहेर दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केली असून ती रोखण्यात संबंधित यंत्रणेला पूर्णतः अपयश आले आहे. याचा परिणाम शनिवारी दोन व्यापाऱ्यांमधील मोठ्या वादात तसेच हाणामारीत झाल्याचे दिसून आले. रात्री उशिरापर्यंत या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली.

दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली असून या घटनेचे व्हिडिओ समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. हाणामारी काठ्यांचा वापर झाल्याचे दिसून येत असून दुपारी घडलेल्या हाणामारीच्या प्रकरणात दुकान मालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. बस स्थानकावर घडलेल्या या प्रकारावेळी नागरिकांनी मोठे गर्दी केली होती. 

गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आले असून त्यातच आता लोकांनी गजबजलेल्या बस स्थानकासारख्या ठिकाणी थेट व्यापारी लाटाकाठ्यांनी हाणामाऱ्या करू लागल्याने पोलिसांचा धाक संपला की काय असा प्रश्न यानिमित्ताने सुजाण संगमनेरकरांमधून उपलब्ध होत आहे.


दुपारी बस स्थानकावर घडलेल्या हाणामारीचा बघा हा व्हायरल व्हिडिओ…





