Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

06/10/2026

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मनोज जरांगेनी टेन्शन वाढविले, येथे उमेदवार उभे करणार तर इथले उमेदवार पाडणार… यादीच केली जाहीर
निवडणूक

मनोज जरांगेनी टेन्शन वाढविले, येथे उमेदवार उभे करणार तर इथले उमेदवार पाडणार… यादीच केली जाहीर

राज्यभरात उमेदवार दिले नाहीत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/11/2024Updated:03/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, ०३ नोव्हेंबर 

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्याचा (०४ नोव्हेंबर) अखेरचा दिवस आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी आपापल्या पक्षातील बंडोबांना शांत करण्यासाठी एकवटले असतानाच आता मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी महायुती आणि महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी वाढविणारा निर्णय घेतला आहे. जरांगे यांचे राज्यभरात उमेदवार नसल्याने काहीसा सुटकेचा निश्वास या महायुती आणि महाविकास आघाडीने सोडला आहे.

जरांगे पाटील यांनी या विधानसभा निवडणुकीत कुणाला पाडणार आणि कुणाविरोधात लढणार या मतदारसंघाची थेट नावं जाहीर केली आहे. पाटील यांनी दिलेल्या यादीत काही ठिकाणी महायुतीचे तर काही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार असल्यानं दोन्ही आघाड्यांची धाकधूक वाढली आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उद्या अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे. तर २० तारखेला मतदान होणार आहे. आणि २३ तारखेला निकाल लागणार आहे.

एकीकडे बंडखोरांनी महायुती व महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवली असतांना आता मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी देखील मोठा निर्णय जाहीर केला आहे. जरांगे यांनी जाहीर केलेल्या मतदार संघात आता महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मनोज जरांगे यांच्या उमेदवारांचा सामना करावा लागणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला अल्टीमेटम दिला होता. मात्र, सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही. त्यामुळे त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांच्या विरोधात आपले उमेदवार उभे करण्याचं जाहीर केलं होतं.

त्यानुसार त्यांनी राज्यातील अनेक मतदार संघातून त्यांचे उमेदवार उभे केले आहे. उद्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कोणत्या ठिकाणचे उमेदवार पडणार याची यादीच जरांगे पाटील यांनी जाहीर केली आहे. या यादीत मराठवाड्यातील मतदार संघांचा समावेश आहे. या मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार उभे असल्याने जरांगे यांच्या निर्णयामुळे दोघांचं टेन्शन वाढलं आहे.

या मतदार संघातील उमेदवार जरांगे पाटील पाडणार…

गंगापूर विधानसभा मतदारसंघ, कन्नड विधानसभा मतदारसंघ, हिंगोली मधील कळमनुरी विधानसभा मतदार संघ, परभणी मधील गंगाखेड, भोकरदन, जिंतूर आणि औसा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार पाडणार असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. तर या मतदारसंघात असतील जरांगे यांचे उमेदवार… बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघ, जालना जिल्ह्यातील मंठा परतूर विधानसभा मतदारसंघ, बीड शहर विधानसभा मतदारसंघ, छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री, हिंगोली, पाथरी व हदगाव विधानसभा मतदार संघात उमेदवार दिले आहे. तर छत्रपती संभाजी नगर पश्चिम, बदनापूरमधून जरांगे दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,914
मनोज जरांगे विधानसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

By Annant Ppangarkar06/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत बिनविरोधाचा फॉर्म्युला राबविण्याच्या हालचाली सुरू…

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

06/10/2026

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.