Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

06/10/2026

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिवसेनेच्या बंडखोरासह रासपच्या उमेदवाराने सोडले मैदान, संगमनेरचे लढत बहुरंगी; १३ उमेदवार मैदानात!
निवडणूक

शिवसेनेच्या बंडखोरासह रासपच्या उमेदवाराने सोडले मैदान, संगमनेरचे लढत बहुरंगी; १३ उमेदवार मैदानात!

रणछोडदासानंतर आता हे उमेदवार निवडणूक मैदानात
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/11/2024Updated:04/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, ०४ नोव्हेंबर 

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या बंडखोरासह रासपच्या उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. दोघांनी निवडणुकीचे मैदान सोडल्याने आता निवडणुकीत १३ उमेदवार उरले आहे.

शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विठ्ठल घोरपडे आणि रासपचे उमेदवार रभाजी खेमनर अशी माघार घेतलेल्या दोघा उमेदवारांची नाव आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघ बंडखोरी रोखण्यात महायुतीला यश आले आहे. या मतदारसंघात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे समर्थक अमोल खताळ यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर भाजपाचे खताळ सलग आठ टर्म आमदार राहिलेल्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना लढत देणार आहे.

याशिवाय मनसे आणि वंचितचे उमेदवारही निवडणुकीच्या मैदानात आहे. या दोन्ही उमेदवारांच्या मतांचा फटका कोणाला बसतो हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल. वंचित बहुजन आघाडीकडून अजीज व्होरा या कार्यकर्त्याला संधी देण्यात आली आहे. तर मनसेकडून योगेश सूर्यवंशी आपले नशीब आजमावत आहे.

संगमनेर विधानसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र सोमवारी स्पष्ट झाल्यानंतर आता प्रत्यक्षात प्रचाराला उमेदवारांकडून सुरुवात होणार असून या मतदारसंघात कोणत्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा उमेदवारासाठी आयोजित केल्या जातात याकडदेखील मतदारांचे लक्ष लागले आहेत.

निवडणुकीच्या रिंगणात १३ उमेदवार असले तरी प्रमुख लढत ही महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात, महायुतीचे अमोल खताळ, वंचितचे अजीज व्होरा, मनसेचे योगेश सूर्यवंशी यांच्यात होईल. सलग चार दशके या मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या थोरात यांच्या विरोधात उर्वरित प्रमुख तीन उमेदवारांच्या पारड्यात संगमनेरकर मतदार किती मते टाकतात याची उत्सुकता आहे.

माघारीनंतर निवडणूक मैदानात शिल्लक राहिलेले उमेदवार पुढीलप्रमाणे…

अमोल धोंडीबा खताळ (शिवसेना)

थोरात विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब (काँग्रेस)

योगेश मनोहर सूर्यवंशी (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)

सूर्यभान बाबुराव गोरे (बहुजन समाज पार्टी)

अब्दुलअजीज अहमदशरीफ व्होरा (वंचित बहुजन आघाडी)

अविनाश हौशीराम भोर (जय हिंद जय भारत राष्ट्रीय पार्टी)

कलीराम बहिरू पोपळघट (भारतीय नवजवान सेना पक्ष)

गायकवाड भागवत धोंडीबा (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक)

प्रदीप विठ्ठल घुले (लोकशाही पार्टी) 

भारत संभाजी भोसले (समता पार्टी)

शशिकांत विनायक दारोळे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए)

अजय गणपत भडांगे (अपक्ष)

दत्तात्रेय रावसाहेब ढगे (अपक्ष)

फोटो, पक्ष आणि चिन्हासह उमेदवारांची यादी….

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,158
अंतिम उमेदवार यादी उमेदवारी अर्ज माघार विधानसभा निवडणूक संगमनेर विधानसभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

By Annant Ppangarkar06/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत बिनविरोधाचा फॉर्म्युला राबविण्याच्या हालचाली सुरू…

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

06/10/2026

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.