Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

21/08/2026

५२ हजार रुपयांच्या अवैध अग्निशस्त्रासह युवक जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

21/08/2026

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये निवडणूक निरीक्षकांनी साधला उमेदवार, प्रतिनिधींशी संवाद… शहरातील मतदान केंद्रांची केली पाहणी
निवडणूक

संगमनेरमध्ये निवडणूक निरीक्षकांनी साधला उमेदवार, प्रतिनिधींशी संवाद… शहरातील मतदान केंद्रांची केली पाहणी

निवडणूक निर्णय अधिकारी शैलेंद्र हिंगे यांची माहिती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, ०४ नोव्हेंबर 

संगमनेर, अकोले या दोन विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या भारतीय प्रशासन सेवेतील निवडणूक निरीक्षक हौलनलाल गौईटे यांनी सोमवारी संगमनेर मतदार संघातील मतदान केंद्रांची पाहणी केली. तसेच काही उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींची संवाद देखील साधला असल्याची माहिती संगमनेरचे निवडणूक निर्णय अधिकारी शैलेंद्र हिंगे यांनी दिली आहे.

निवडणूक निरीक्षक हौलनलाल गौईटे यांचा मुक्काम संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहात असून त्यांचा ८७८८४९१६४१ हा संपर्क क्रमांकदेखील जाहीर करण्यात आला आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याच्या आवाहनाबरोबरच आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी निवडणूक यंत्रणेने सतर्क राहून कामकाज करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी निवडणुकीशी संबंधित यंत्रणांना दिल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी तीन निवडणूक निरीक्षकांच्या नेमणुका केल्या आहे यात सामान्य, पोलीस व खर्च निरीक्षकांचा समावेश आहे.

संगमनेर आणि अकोले विधानसभा मतदार संघासाठी हौलीनलाल गौईटे यांची निवडणूक निरीक्षक (सामान्य) म्हणून नियुक्ती केली असल्याने त्यांनी सोमवारी संगमनेर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला घेतला. आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी निवडणूक यंत्रणेने सतर्क राहून कामकाज करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

त्यांनी निवडणुकीचे नोंदणी कार्यालय, स्ट्रॉंग रूम, एमसीसी, कंट्रोल रूम, साहित्य विभाग, कार्यालयात असलेली सीसीटीव्ही आणि आचारसंहिता कक्षाची पाहणी केली. नियंत्रण कक्षाला भेट देऊन आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले.

गौईटे म्हणाले, प्रचार सभा, मिरवणुका व कार्यक्रमांवर केल्या जाणाऱ्या खर्चावर निगराणीसाठी असलेल्या पथकांनी अत्यंत बारकाईने व्हिडिओ चित्रीकरण करावे. कुठल्याही पथकाच्या माध्यमातून अथवा कुठल्याही चेकपोस्टवर कारवाई करताना अथवा तपासणी तसेच कारवाई करताना निवडणूक आयोगाच्या अपेक्षेप्रमाणे फलनिष्पत्तीवर भर देण्यात यावा. निवडणूकीच्या निमित्ताने होणाऱ्या प्रत्येक अर्थविषयक बाबींवर अत्यंत सुक्ष्मपणे लक्ष द्यावे. वाहनांची तपासणी अधिक दक्षतापूर्वक करावी. पथकांनी त्यांना नेमून देण्यात आलेल्या जबाबदारीप्रमाणे प्रभावीपणे काम करावे.

भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक गोष्टींची नोंद ठेवून सहाय्यक खर्च निरीक्षकांच्या संपर्कात राहावे. मतदारांना प्रभावित करण्यासाठीच्या रोख रक्कम, मद्य तसेच प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतुकीस प्रतिबंध करावा. कारवाईमध्ये सातत्य ठेवावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. त्यांनी कायदा सुव्यवस्था, रोख रक्कम व मद्य जप्ती या विषयी आढावा घेतला.

निवडणूक निरीक्षक (सामान्य) हौलीनलाल गौईटे यांच्याशी ८७८८४९१६४१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. त्यांचा मुक्काम सह्याद्री कक्ष, शासकीय विश्रामगृह संगमनेर येथे असणार आहे. संगमनेर-२१७ विधानसभा मतदानसंघातील ज्या व्यक्तींना निवडणूक प्रक्रिया संबंधीत संपर्क साधायचा झाल्यास दररोज (सार्वजनिक सुट्टी वगळून) सकाळी ११.०० ते ११.३० या वेळेत शासकीय विश्रामगृह संगमनेर येथे ते उपलब्ध असणार आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,003
विधानसभा निवडणूक शैलेंद्र हिंगे संगमनेर विधानसभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

शिक्षण प्रसारक संस्थेत पुन्हा मालपाणींचे वर्चस्व, मात्र एकाकी लढतीत ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिली कडवी झुंज; ११२ मतांनी वेधले सर्वांचे लक्ष

25/05/2026

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय; अजित पवारांचा मताधिक्याचा विक्रम मोडला, आत्तापर्यंतचा देशातील सर्वात मोठा विजय

04/05/2026

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी रणधुमाळी सुरू; १२ मे रोजी मतदान आणि निकाल, पाहा संपूर्ण वेळापत्रक!

16/04/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
अपघात

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

By Annant Ppangarkar21/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: एका दुःखद प्रसंगासाठी एकत्र आलेल्या नातेवाईकांवर नियतीने आणखी एक भीषण…

५२ हजार रुपयांच्या अवैध अग्निशस्त्रासह युवक जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

21/08/2026

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026

अवैध गुटखा माफियांचे कंबरडे मोडले; स्थानिक गुन्हे शाखेची तब्बल ९४ लाख ६८ हजारांच्या मुद्देमालासह ५८ आरोपींवर धडक कारवाई

21/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.