बुधवार, ०६ नोव्हेंबर
मुंबई – राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. महायुती आणि महाविकास आघाडीच्या बहुतेक इच्छुकांनी पक्षाचा आदेश न पाळता निवडणुकीसाठी अर्ज भरत बंडखोरी केली. या पार्श्वभूमीवर पक्षाचा आदेश न पाळल्याचा ठपका ठेवत भारतीय जनता पक्षाने ४० जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे मतदार संघाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि श्रीगोंदा येथील सुवर्णा पाचपुते यांचा समावेश आहे.
महायुतीच्या उमेदवाराविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या बंडखोरांना भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले होते. पक्षाचा आदेश मानत बहुतेकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. मात्र तरीदेखील पक्षाचा आदेश न पाळता निवडणुकीच्या मैदानात उतरणाऱ्या चाळीस जणांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. यासंबंधीचे आदेश भाजपचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी काढले आहे.
कारवाई झालेल्या बंडखोरांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे मतदार संघाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा तसेच श्रीगोंदा येथून निवडणूक लढविणाऱ्या सुवर्णा पाचपुते यांच्यासह पक्षातील अन्य उमेदवारांचा समावेश आहे.
यांच्यावर झाली हकालपट्टीची कारवाई…



