Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » युवा संवाद यात्रा : येथील वातावरण गढूळ कराल तर जशास तसे उत्तर दिले जाईल – डॉ. जयश्री थोरात
निवडणूक

युवा संवाद यात्रा : येथील वातावरण गढूळ कराल तर जशास तसे उत्तर दिले जाईल – डॉ. जयश्री थोरात

शहरातही युवा संवाद यात्रेचे जल्लोषात स्वागत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

यात्रेत दोन हजारावर तरुण-तरुणींचा सहभाग 
विधानसभा निवडणूक तालुक्याच्या अस्मिता आणि स्वाभिमानाची
शुक्रवार, ०८ नोव्हेंबर

संगमनेर – संगमनेर तालुका हा कायमच शांतताप्रिय आहे. परंतु या तालुक्यातील जर कोणी येथील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला यापुढील काळात जशास तसे उत्तर दिले जाईल. येथील विधानसभा निवडणूक संगमनेर तालुक्याच्या अस्मितेची आणि स्वाभिमानाची असल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी केले.

राज्याचे माजी मंत्री काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात नवव्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यांच्या प्रचारार्थ डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी संगमनेर शहरात युवा संवाद यात्रा काढण्यात आली होती. दिवसभर शहराच्या सर्वच भागात सुरू असलेल्या या यात्रेत दोन हजारावर तरुण-तरुणींचा सहभाग होता. अनेक ठिकाणी यात्रा जाण्याच्या मार्गावर जेसीबीमधून फुलांची उधळण करण्यात आली तसेच ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीत अभूतपूर्व स्वागतदेखील करण्यात आले. यात्रेमुळे तरुण-तरुणीमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.

संगमनेर नगर परिषदेजवळून माळीवाडा येथील क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या स्मारकाला पुष्पहार प्रदान करून युवा संवाद यात्रेची सुरुवात करण्यात आली. डॉ. जयश्री थोरात, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, डॉ. हर्षल तांबे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले होते.

जयश्री थोरात म्हणाल्या, हा तालुका स्वातंत्र्य सैनिकांचा तालुका आहे. गेली चाळीस वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आमदार बाळासाहेब थोरात करत आहे. मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर ते पुन्हा नवव्यांदा महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून विधानसभेच्या निवडणुकीस उभे आहे. त्यांना तालुक्यातील मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

ही निवडणूक तालुक्याच्या स्वाभिमानाची आणि अस्मितेची असून निवडणुकीच्या या महोत्सवात तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्ता मोठ्या आनंदाने सहभागी झाला आहे. आजच्या मोटार सायकल रॅली मधील उत्साह हेच दर्शवतो. संगमनेर करांचा थोरात यांना मोठा पाठिंबा मिळत असून राज्यातील विक्रमी मताधिक्य मिळविण्यासाठी काम करण्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

आमदार बाळासाहेब थोरात हे कधीही निवडणूक म्हणून काम करत नाही. प्रत्येक कुटुंबाचा विकास व्हावा हा त्यांचा ध्यास आहे. निवडणूक संपली की दुसऱ्या दिवसापासून कुटुंबप्रमुख म्हणून ते पुन्हा आपल्या कामाला सुरुवात करतात. पाच वर्षांसाठी आपले काम करत असताना यापुढील पंधरा दिवस मात्र आपण त्यांच्यासाठी निवडणुकीत काम करण्याची आवश्यकता आहे. – दुर्गाताई तांबे. 

राज्यात महाविकास आघाडी असल्याने संगमनेरमधील शिवसैनिक आमदार बाळासाहेब थोरात यांच्या बाजूने पूर्णपणे उभे आहेत. त्यांच्या प्रचारात सक्रिय आहे. खेड्यापाड्यात घरोघरी जाऊन काम करत आहे. संगमनेर शहराला थेट निळवंडे धरणातून शुद्ध पाणी देणारे थोरात यांचे एकमेव नेतृत्व असून त्यांच्या पाठीशी हा तालुका भक्कमपणे उभा राहणार आहे. या तालुक्यात गद्दारांना थारा नसून समोरच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने आत्तापर्यंत किती पक्ष बदलले याचा मतदारांना अभ्यास करावा लागेल. – अमर कतारी.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,312
अमर कतारी जयश्री थोरात दुर्गाताई तांबे युवा संवाद यात्रा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – समग्र शिक्षा योजना सन २०२६-२७ अंतर्गत संगमनेर विधानसभा…

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.