Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माजी मंत्री अमित देशमुख, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत तळेगाव दिघेत रविवारी युवक मेळावा
निवडणूक

माजी मंत्री अमित देशमुख, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत तळेगाव दिघेत रविवारी युवक मेळावा

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, ०८ नोव्हेंबर 

विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात येऊ लागला असून महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी माजी मंत्री अमित देशमुख आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे रविवारी तळेगाव दिघे येथे युवक मेळाव्याच्या निमित्ताने येत आहे, अशी माहिती युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी दिली.

संगमनेर विधानसभा मतदारसंघातून नवव्यांदा निवडणूक लढविणाऱ्या महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ रविवारी तळेगाव दिघे येथे युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (१० नोव्हेंबर) संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या या मेळाव्यासाठी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे. तळेगाव दिघे येथे हे दोन्ही नेते विरोधकांवर टीका करताना काय भाष्य करतात याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

आमदार बाळासाहेब थोरात हे तालुक्यातील जनतेच्या पाठबळावर नवव्या वेळेस निवडणूक लढवत असून तालुक्यासाठी ही मोठी अभिमानाची बाब आहे. थोरात यांनी निळवंडे धरण व कालवे पूर्ण करून दुष्काळग्रस्तांना पाणी दिले आहे. संगमनेर शहरात विविध वैभवशाली इमारती उभ्या केल्या असून शहर हायटेक केले आहे. सहकार, शिक्षण व शेती क्षेत्रातील प्रगतीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करून त्यांनी तालुक्याला वैभव प्राप्त करून दिले आहे.

विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य, सुसंस्कृत नेतृत्व म्हणून राज्यभर त्यांची ओळख असून महाविकास आघाडीच्या समन्वयाची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर दिली आहे. थोरात राज्यभर महाविकास आघाडीच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळत आहे.

मेळाव्यासाठी संसद रत्न खासदार कोल्हे, माजी मंत्री देशमुख यांच्यासह बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, शिर्डी विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या प्रभावती घोगरे, शिवसेनेचे माजी शहर अध्यक्ष अमर कतारी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कोपरगावचे उमेदवार संदीप वर्पे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.

या मेळाव्यासाठी युवक युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाविकास आघाडी, मित्र पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,798
अमित देशमुख अमोल कोल्हे प्रचार सभा बाळासाहेब थोरात युवक मेळावा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.