Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निष्ठावंत म्हणवले जाणारे प्रचारापासून दूर असतानाच आता माजी शहर प्रमुख अमर कतारींच्या नेतृत्वाखाली ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीच्या थोरातांच्या प्रचारासाठी मैदानात! शहरात पदयात्रेच्या माध्यमातून प्रचार मोहीम…
निवडणूक

निष्ठावंत म्हणवले जाणारे प्रचारापासून दूर असतानाच आता माजी शहर प्रमुख अमर कतारींच्या नेतृत्वाखाली ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीच्या थोरातांच्या प्रचारासाठी मैदानात! शहरात पदयात्रेच्या माध्यमातून प्रचार मोहीम…

पक्षाचा आदेश हाच आमच्यासाठी अंतिम आदेश
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/11/2024Updated:10/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विधानसभा निवडणूक – अनंत पांगारकर

शनिवार, ०९ नोव्हेंबर 

संगमनेर विधानसभा मतदारसंघातून नवव्यांदा निवडणूक लढविणारे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात राज्यभर उमेदवारांची प्रचार मोहीम राबवत असताना संगमनेरात मात्र कार्यकर्त्यांनी प्रचार मोहीम हाती घेतली आहे. उद्धव बाळासाहेब शिवसेनेचे निष्ठावंत म्हणविले जाणारे अनेक जण प्रचार मोहिमेपासून दूर असताना माजी शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी यांच्या नेतृत्वाखाली मात्र शिवसेनेतील एक गट प्रचारात सक्रिय झाला आहे. थोरात यांच्यासाठी पंजाचा प्रचार करत ते शहराच्या विविध भागात पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत आहे.

थोरात यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असून नवव्यांदा त्यांना पुन्हा लोकप्रतिनिधी म्हणून पाठविण्यासाठी मतदार सज्ज असताना शहराच्या विविध भागातून कतारी यांनी काढलेल्या या प्रचार फेऱ्या देखील मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरल्या आहे. महाविकास आघाडीचा धर्म या फेऱ्यांमधून पाळला जात असल्याचा संदेश मतदारांमध्ये पोहोचविण्यात कतारी यशस्वी झाले आहे. तसेच निष्ठावंत म्हणविल्या जाणाऱ्या, अपेक्षा ठेवून असलेल्या आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारापासून अद्यापही दूर असलेल्यांसाठी ही चपराक मानली जात आहे.

सुरुवातीला या मतदारसंघात टायगरच्या डरकाळ्यांनी मोठी चुरस निर्माण केली होती. मात्र सुरस निर्माण करणारा टायगर या मतदारसंघातील सिंहाशी लढेल याची सुतराम शक्यता वाटत नव्हती. अखेरीस तसेच घडले आणि थोरात यांच्या विरोधात भाजपकडून आयात केलेला उमेदवार शिवसेनेच्या तिकिटावर लादण्यात आला. याचवेळी थोरात यांच्यासाठी ही निवडणूक एकतर्फी झाली असताना देखील थोरात समर्थक आणि महाविकास आघाडीतील ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक थोरात यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी गांभीर्याने घेतली आहे.

संगमनेर शहर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी संगमनेर शहरात सकाळी आणि संध्याकाळी विविध भागात शिवसैनिकांना तसेच मोठ्या प्रमाणात महिलांना सोबत घेत पदयात्रेच्या माध्यमातून शहरातील प्रभाग निहाय प्रचार दौरा सुरू केला आहे.

आतापर्यंत ठाकरेंच्या मशालीचा प्रचार करताना आता आघाडीचा धर्म पाळत ते थेट हाताच्या पंजाचा प्रचार करू लागले आहे. आघाडीची भूमिका ते मतदारांना पटवून देत आहे. त्यांच्या प्रचार फेऱ्यांना चांगला प्रतिसाद लावताना दिसतो. रस्त्यावर, व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये, विविध गल्लीबोळात, घरोघर त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक या प्रचार फेऱ्यांमध्ये सहभागी झाले आहे.

माजी शहर प्रमुख अमर कतारी यांच्या नेतृत्वाखाली युवासेना जिल्हा समन्वयक फैसल सय्यद, वाहतुक सेना शहरप्रमुख इम्तियाज शेख, युवासेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, युवासेना शहरप्रमुख कयूम शेख, आसिफ तांबोळी, प्रथमेश बेल्हेकर, संगमनेर नगरपरिषद पथविक्रेता समिती सदस्य दीपक साळुंके, विभाग प्रमुख परवेज शेख, इमरान सैय्यद, प्रशांत खजुरे, प्रकाश चोथवे, सचिन साळवे, मच्छिंद्र फुलमाळी, हर्ष कतारी, तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, शिवसैनिक यात सहभागी झाले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 8,291
अमर कतारी विधानसभा निवडणूक संगमनेर विधानसभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

निमोण येथे शिवसेनेच्या नूतन शाखेचे थाटात उद्घाटन; धांदरफळमध्ये आढावा बैठक ‘शिवसेना घराघरात, शिवसेना मनामनात’ पोहचवण्यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक सज्ज

24/08/2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश

14/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने…

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.