Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर न्यायालयाचा मोठा निकाल! वारकऱ्यांच्या दिंडीत कंटेनर घुसवणाऱ्या चालकाला दिली ‘ही’ शिक्षा

07/10/2026

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम; सव्वाशे पदकांसह उपविजेतेपदावर कोरले नाव

07/10/2026

तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एक फोन आणि सोयाबीनला ४ हजार रुपयांची मदत; दुष्काळात शेतकऱ्यांना जाणवू लागली अनुभवी नेतृत्वाची उणीव

07/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जीभ घसरलेल्या भाजप खासदाराची लाडक्या बहिणींना भरसभेत दमदाटी… योजनेचे १५०० रुपये घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, नाव लिहून घ्या आणि आम्हाला पाठवा, त्यांची व्यवस्था आम्ही करू
निवडणूक

जीभ घसरलेल्या भाजप खासदाराची लाडक्या बहिणींना भरसभेत दमदाटी… योजनेचे १५०० रुपये घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, नाव लिहून घ्या आणि आम्हाला पाठवा, त्यांची व्यवस्था आम्ही करू

घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गुण गायचे त्यांचे…असलं चालणार नाही
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/11/2024Updated:10/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, १० नोव्हेंबर

जीभ घसरलेल्या भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या विधानामुळे आणि दमदाटीमुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. खासदार महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दीड हजार रुपये घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, नाव लिहून घ्या आणि आम्हाला पाठवा. त्यांची व्यवस्था आम्ही करू, असं वक्तव्य केलं आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. आपल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ नेत्यांच्या, पुढाऱ्यांच्या सभा भाषणांनी वेग घेतला आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या भाषणांमधून अनेक नेत्यांची जीभ घसरत असल्याचे समोर येत आहे. पैसे घेतले तर आम्हालाच मते द्यावी लागतील, अशी इशारा वजा धमकी सत्ताधारी गटाचे आमदार रवी राणा यांच्यासह अनेक नेत्यांनी याआधी दिल्या आहेत. संगमनेरमध्ये सुजय विखे यांच्या सभेत भाजपच्या वसंत देशमुख या वाचाळवीराने माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मुली संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात संतापाचे वातावरण असतानाच आता त्यात पुन्हा एकदा महाडिक यांच्या वक्तव्याची भर पडली आहे.

लोकसभेत मोठा फटका बसल्यानंतर सत्ताधारी महायुती सरकारने विधानसभेच्या तोंडावर महिलांची मते डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. सरकारच्या प्रमुख नेत्यांनी आचारसंहितेपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात मेळावे घेऊन या योजनेचा प्रचार-प्रसार केला. योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत महिलांना ५ महिन्यांचे साडे सात हजार रुपये मिळाले आहेत. या माध्यमातून महिलांच्या मतांची पेरणीच सत्ताधाऱ्यांनी केल्याचे बोलले जात आहे.

महाडिक यांनी लाडक्या बहिणींनाच भरसभेत दमदाटी केली असल्याने याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यावर सतेज पाटील यांनी महाडिक यांचा व्हिडिओ शेअर करत टीका केली आहे. भाजप खासदार धनंजय महाडिक यांची मुजोरी, महिलांना जाहीर सभेत धमकी, असे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.

https://x.com/satejp/status/1855264608673800650?s=19

काय म्हणाले धनंजय महाडिक …

भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेबाबत वादग्रस्त विधान केले. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दीड हजार रुपये घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या. नाव लिहून घ्या आणि आम्हाला पाठवा. त्यांची व्यवस्था आम्ही करू. घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गुण गायचे त्यांचे…असलं चालणार नाही, असे धनंजय महाडिक म्हणाले होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,026
धनंजय महाडिक बेताल वक्तव्य भाजप
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर न्यायालयाचा मोठा निकाल! वारकऱ्यांच्या दिंडीत कंटेनर घुसवणाऱ्या चालकाला दिली ‘ही’ शिक्षा

By Annant Ppangarkar07/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महामार्गावरून पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत निष्काळजीपणे कंटेनर घुसवून चार जणांना चिरडून…

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम; सव्वाशे पदकांसह उपविजेतेपदावर कोरले नाव

07/10/2026

तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एक फोन आणि सोयाबीनला ४ हजार रुपयांची मदत; दुष्काळात शेतकऱ्यांना जाणवू लागली अनुभवी नेतृत्वाची उणीव

07/10/2026

बुधवार, ०७ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल

07/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.