Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

९४ हजार शाळा बंद, अडीच कोटी मुलांचा काढता पाय; शासकीय शिक्षणव्यवस्था विसर्जनाच्या मार्गावर?

July 27, 2026

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पालकमंत्री मालक नसतो… तुमच्या वडिलांनी ३५ वर्षात काय केले ते सांगा… टायगर बिबट्या काही नाही हे तर कुपाटी-कुपाटीने पळाले
निवडणूक

पालकमंत्री मालक नसतो… तुमच्या वडिलांनी ३५ वर्षात काय केले ते सांगा… टायगर बिबट्या काही नाही हे तर कुपाटी-कुपाटीने पळाले

दहशतवाद इकडे बोलावणे, हे अत्यंत चुकीचे आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरNovember 15, 2024Updated:November 16, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, १५ नोव्हेंबर 

मिळालेल्या संधीचा उपयोग तालुक्याच्या विकासासाठी केला. निळवंडे धरण आणि कालव्यांची कामे पूर्ण करून पाणी दिले, ज्या लोकांनी अडथळे निर्माण केले ते आता येथे येऊन विकासाच्या बाता मारत आहे. तुमचे वडील इकडे खासदार होते. ३५ वर्षात त्यांनी काय केले हे आधी सांगा. तुमचा खोटारडेपणा संपूर्ण राज्याने पाहिला असून मागील अडीच वर्षात तुम्ही तालुक्याचा छळ केला. पालकमंत्री हा मालक नसतो असे स्पष्ट करतानाच तुमची दडपशाही इकडे चालू शकणार नाही असा थेट इशारा राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे यांचे नाव न घेता दिला.

विधानसभा निवडणूक प्रचारार्थ संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील सभेत थोरात बोलत होते. सिताराम पावसे अध्यक्षस्थानी होते. डॉ. जयश्री थोरात, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, शिवसेनेचे कैलास वाकचौरे, दिलीप साळगट आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

थोरात म्हणाले, संगमनेरकरांनी कायम आपल्यावर प्रेम केले म्हणून राज्यात काम करण्याची संधी मिळाली. महाविकास आघाडीच्या समन्वयाची राज्याची मोठी जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळे मी राज्यभर फिरत होतो. माझा मतदारसंघ कार्यकर्त्यांनी सांभाळला. ज्यांना त्यांच्या मतदारसंघातील रस्ता नीट करता आला नाही ते इकडे येऊन विकासाच्या गप्पा मारत आहे.

धांदरफळच्या सभेत वाईट बोलणाऱ्याला यांनी प्रोत्साहन दिले. ती घटना अत्यंत दुर्दैवी होती. यामुळे अवघ्या दहा मिनिटात संगमनेर तालुका पेटून उठला. इकडे येऊन वाईट बोलले. संगमनेर तालुका कुणाच्या वाटेला जात नाही आणि कुणी आमच्या वाटेला गेले तर सोडत नाही. त्यावेळेस हे कुपाटी-कुपाटीने पळाले.

हे टायगर-बिबट्या वगैरे काहीच नाही. बिबट्या म्हणून बिबट्याचा अपमान करू नका असे सांगताना संगमनेर तालुक्याची अस्मिता काय आहे हे त्यांनी आता पाहिले आहे. या सर्व प्रकाराची दुरुस्ती केली जाईल. तालुक्याचा विकास थांबविण्यासाठी यांनी खडी क्रेशर बंद केले. रस्त्यांची कामे बंद पाडली. हजारो मजूर रस्त्यावर आणले. अनेकांवर विनाकारण खोटे केसेस दाखल केल्या.

आपल्या येथील काही लोक त्यांना इकडे आमंत्रण देतात. विरोधक यामागे होते. विरोधकांचा आपण सन्मान केला पण दहशतवाद इकडे बोलावणे, हे अत्यंत चुकीचे आहे. म्हणून त्यांचा हल्ला आपण परतू लावलाच पण राहत्यामध्ये जाऊनही यापण दुरुस्त करणार आहोत.

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, आमदार बाळासाहेब थोरात राज्यात काम करतात. मी तालुक्यात जनतेत फिरले. मी काय चूक केली त्यामुळे ते माझ्या विरुद्ध बोलले. त्यांच्या कृतीने संपूर्ण तालुका पेटून उठला. यात माझे भाऊ माझ्या मागे उभे राहिले. त्यांच्यावर ३०७ चे गुन्हे दाखल झाले. हा कुठला अन्याय आहे. मी आठ तास पोलीस स्टेशन बाहेर उभी होते. मात्र माझी केस घेतली गेली नाही, उलट माझ्यावरच केस टाकली. ही दडपशाही आपण सहन करायची नाही. सर्वांनी २० तारखेला एकजुटीने मोठ्या मताधिक्याने आमदार थोरात यांना विजयी करा.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,181
बाळासाहेब थोरात विधानसभा निवडणूक संगमनेर विधानसभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक

July 26, 2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने संगमनेरात शेतकऱ्यांचा दीड तासांचा महामार्ग रोको मागे शासकीय बफर स्टॉकमधून युरिया मिळताच आंदोलन स्थगनावर शिक्कामोर्तब; लिंकिंग आणि ढिसाळ नियोजनावरून महायुती सरकारवर कडाडून टीका

July 21, 2026

संगमनेरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे भक्तिमय वातावरणात आगमन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून स्वागत व पूजन

July 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

९४ हजार शाळा बंद, अडीच कोटी मुलांचा काढता पाय; शासकीय शिक्षणव्यवस्था विसर्जनाच्या मार्गावर?

By अनंत पांगारकरJuly 27, 20260

विशेष लेख | भाऊसाहेब चासकर स्पर्धेच्या नावाखाली आज आपण मुलांचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्वच आपण नाकारत आहोत.…

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.