Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम; सव्वाशे पदकांसह उपविजेतेपदावर कोरले नाव

07/10/2026

तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एक फोन आणि सोयाबीनला ४ हजार रुपयांची मदत; दुष्काळात शेतकऱ्यांना जाणवू लागली अनुभवी नेतृत्वाची उणीव

07/10/2026

बुधवार, ०७ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल

07/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो, इतकी वर्षे काम करून देखील मला एवढा त्रास झाला नाही तो आता होत आहे; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
निवडणूक

दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो, इतकी वर्षे काम करून देखील मला एवढा त्रास झाला नाही तो आता होत आहे; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य

आता जबाबदारी पुढच्या पिढीकडे द्या, शरद पवारांच्या वक्तव्याने अजितदादा अडचणीत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, १७ नोव्हेंबर 

एवढी कामे करून मी दुसऱ्या मतदारसंघात उभा राहिला असतो तर निवडून आलो असतो, इतकी वर्षे काम करून देखील मला एवढा त्रास झाला नाही तो आता होत आहे. आता भावनिक झालात तर बारामतीला कोणी वाली राहणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या वक्तव्यांवरून बारामतीत काय होणार, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

पूर्वीच्या विधानसभा निवडणुकीकडे बारामती मतदारसंघात एवढे न फिरकणारे, दरवेळी समोरच्याचे डिपॉझिट जप्त करणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाऊले सध्या बारामतीतच खिळलेली दिसत आहेत.

खुद्द शरद पवार यांनी अजित पवारांच्या पुतण्यालाच उभे केल्याने अजित पवार यांना बारामतीतच अडकून पडावे लागत आहे. कोणत्याही निवडणुकीत झाला नाही तेवढा त्रास या निवडणुकीत होत असल्याचे खुद्द अजित पवारांनीच कबुल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अजित पवार कधी नव्हे तेवढा आपलाच मतदारसंघ फिरत आहेत. लोकांना आपण केलेल्या विकासकामांची आठवण करून देत आहेत. तसेच शरद पवार साहेबांनंतर मीच, माझ्याशिवाय एवढी विकासकामे करण्याची धमक कोणाच्यात नाही असे सांगत आहेत. गेली ३० वर्षे बारामतीकर अजित पवारांच्या पाठीशी आहेत, तेही शरद पवार यांच्यामुळे. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यानंतर अजित पवारांनी बहिणीविरोधात पत्नीला उभे करणे ही आपली चूक होती हे कबुलही केले आहे.

परंतू काकांनी आता ३० वर्षे मला दिली, ३० वर्षे अजित पवारांना दिली आता पुढच्या पिढीकडे जबाबदारी द्या, असे म्हणत काडी टाकली आहे. बारामतीकर आता अजित पवारांच्या बाजुने उभे राहतात की शरद पवारांच्या याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

लोकसभेला बारामतीकरांसमोर इकडे आड, तिकडे विहीर अशी परिस्थिती होती. तेव्हा तुम्ही आडाला खूश केले. आता विधानसभेला विहिरीला खूश करा, असे आवाहन अजित पवार यांनी केले. तसेच आजपर्यंत आपण पवार साहेबांकडे पाहून मतदान मागत आलो आहोत. निवडणुकीला उभे कोण आहे, त्याचा फोटो लावा ना, त्याच्या नावावर मत मागा, असेही अजित पवार यांनी पुतण्या युगेंद्र पवार यांना म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 867
अजित पवार युगेंद्र पवार शरद पवार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
क्रिडा व कला

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम; सव्वाशे पदकांसह उपविजेतेपदावर कोरले नाव

By Annant Ppangarkar07/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सातारा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत संगमनेरच्या गीता परिवाराच्या विद्यार्थ्यांनी…

तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एक फोन आणि सोयाबीनला ४ हजार रुपयांची मदत; दुष्काळात शेतकऱ्यांना जाणवू लागली अनुभवी नेतृत्वाची उणीव

07/10/2026

बुधवार, ०७ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल

07/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.