Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या नावाखाली तरुणांना फसवले, मुख्यमंत्र्यांचा सभेचा फुसका बार – अमर कतारी
निवडणूक

मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या नावाखाली तरुणांना फसवले, मुख्यमंत्र्यांचा सभेचा फुसका बार – अमर कतारी

बनवाबनवी बंद करा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/11/2024Updated:19/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, १८ नोव्हेंबर

संगमनेर – संगमनेर तालुका हा एकनिष्ठ विचारांचा आहे. आमदार बाळासाहेब थोरात काँग्रेस पक्षाशी तर संपूर्ण तालुक्यातील शिवसैनिक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहे. त्यामुळे त्यांच्याशी गद्दारी करून सरकार स्थापन केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संगमनेरमध्ये पाऊल ठेवू शकणार नव्हते. मात्र त्यांच्या नावाखाली तालुक्यातील तरुणांना बनवाबनवी करून संगमनेरात बोलावून फसवले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या सभेचा बार फुसका ठरल्याची टीका शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी केली आहे.

कतारी यांनी म्हटले आहे की, सध्याचे मुख्यमंत्री यांनी उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आणि संगमनेरमध्ये गद्दारीला माफी नाही. त्यामुळे मुख्यमंत्री येथे येणार नव्हते. हे सर्वश्रूत होते. कोणताही शासकीय अधिकृत दौरा नव्हता. मात्र राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप व आता शिवसेना (शिंदे गट) असा राजकीय पक्ष प्रवेश करणाऱ्या महायुतीच्या उमेदवाराने मुख्यमंत्री येणार अशी खोटी जाहिरात केली.

सभेसाठी संगमनेर तालुक्याऐवजी बाहेरच्या तालुक्यातील तरुण बोलवले. श्रीकांत शिंदे सुद्धा येणार नव्हते. मात्र अशी ही बनवाबनवी करून तरुणांना यांनी फसवले. एक तर तुम्ही शिंदे सेनेचेही एकनिष्ठ नव्हते. तुम्ही भाजपशी एकनिष्ठ नव्हते. मूळ शिवसेना आणि भाजपवाले लांब आहेत.

फक्त लोणी विखेंच्या इशारावर नाचणारी भाजप आणि शिंदे सेना शहरात असून त्यांना कोणीही थारा देत नाही. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराची मोठी पंचायत झाली असून मुख्यमंत्री आणि कोणीच पदाधिकारी संगमनेरमध्ये आले नसल्याने ग्रामीण भागातून आलेल्या तरुणांनी संताप व्यक्त केला असल्याचे कतारी यांनी म्हटले आहे.

हे धंदे बंद करा…

एक तर तुम्ही अनेक पक्ष बदलले. खोटे बोलून आम्हाला संगमनेरमध्ये बोलवले. मुख्यमंत्री आले नाही. आम्हाला ताटकळत ठेवले. प्यायला पाणी नाही. आता हे धंदे बंद करा, असा संताप ग्रामीण भागातील तरुणांनी महायुतीचे उमेदवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर व्यक्त केला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 16,986
अमर कतारी एकनाथ शिंदे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

निमोण येथे शिवसेनेच्या नूतन शाखेचे थाटात उद्घाटन; धांदरफळमध्ये आढावा बैठक ‘शिवसेना घराघरात, शिवसेना मनामनात’ पोहचवण्यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक सज्ज

24/08/2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश

14/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.