Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने भव्य शासकीय कागदपत्रे व नोंदणी शिबिर
सामाजिक

संगमनेर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने भव्य शासकीय कागदपत्रे व नोंदणी शिबिर

उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांच्या सूचनेनुसार शहर प्रमुख फैसल सय्यद व अमित चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/04/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: 

हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने संगमनेर येथे रविवारी एक विशेष सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील तसेच उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय कागदपत्रांचे मार्गदर्शन व नोंदणी शिबिर अलकानगर येथे उत्साहात पार पडले.

सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत झालेल्या या शिबिरात नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देऊन आवश्यक कागदपत्रांची नोंदणी करण्यात आली. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन आयोजित केलेल्या या उपक्रमात नागरिकांसाठी विनामूल्य ओळखपत्र दुरुस्ती, ई-श्रम कार्ड, आभा कार्ड, पॅन कार्ड आणि रेशन कार्ड संदर्भातील त्रुटी दूर करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, विधानसभा संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे आणि निरीक्षक झिशान चंगेज मुलतानी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वी झाले. उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांच्या सूचनेनुसार शहर प्रमुख फैसल सय्यद व अमित चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील यांनी उपस्थित राहून शहर प्रमुखांच्या कामाचे कौतुक केले व आगामी काळात शिवसेनेचे सामाजिक कार्य अधिक बळकट करण्याचा विश्वास व्यक्त केला. शिवसेनेचे विचार घराघरात पोहोचवून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

या शिबिरात नागरिकांना रेशन कार्ड संदर्भातील नवीन १२ अंकी कोड, नाव समाविष्ट करणे किंवा वगळणे, नवीन मतदार नोंदणी आणि एसआयआर नोंदणी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्यातून तयार झालेली नवीन रेशन कार्ड २५ लाभार्थी नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली.

अमर कतारी यांनी यावेळी नागरिकांना शासनाच्या योजना हा त्यांचा हक्क असल्याचे सांगत मतदान नोंदणीचे महत्त्व पटवून दिले. शिवसेना नेहमीच जनतेच्या सेवेसाठी धावून येईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. कार्यक्रमाचे स्वागत शहर प्रमुख अमित चव्हाण यांनी केले, तर शहर प्रमुख फैसल सय्यद यांनी शिबिराची सविस्तर माहिती देत सूत्रसंचालन केले. तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, भीमाशंकर पावसे आणि वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख इम्तियाज शेख यांनीही या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. एकाच ठिकाणी सर्व शासकीय सेवा उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांनी शिवसेनेचे आभार मानले.

या प्रसंगी संघटक दीपक साळुंके, समन्वयक बाळासाहेब घोडके, माजी शहरप्रमुख पप्पू कानकाटे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विजय सातपुते, व्यापारी आघाडी शहर प्रमुख संभव लोढा, आश्वी प्रमुख प्रकाश गायकवाड, उपशहर प्रमुख कैलास गायके, नितीन पारखे, लिंगमूर्ती चिंता, युवा सेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, तालुकाप्रमुख भाऊसाहेब वराळे, परवेज शेख, उपशहर प्रमुख इरफान सय्यद, विभाग प्रमुख जमीर करीम शेख, शाखा प्रमुख अजीम अत्तार, ज्येष्ठ शिवसैनिक मुसा कासम पठाण, फाईक इम्तियाज शेख, नईम शादाब पठाण, इम्रान अय्युब सय्यद, अतिक फारुक पटेल, मतीन याकूब शेख, शाहिद हसन बेपारी, अकिब महम्मद सय्यद, मोईन नईम पिंजारी, रिजवान सय्यद, अरकान सय्यद यांच्यासह सहा अंगणवाडी सेविका व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 487
अमर कतारी अमित चव्हाण शिबिर शिवसेना उद्धव ठाकरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – तालुक्याचा विकास हा कष्टातून उभा राहिला असून केवळ मोबाईलवर अफवा…

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.