Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिवाजी कोण होता?’ वाचण्यासाठी संगमनेरकर रस्त्यावर; आमदार गायकवाडांचा ‘वंचित’कडून अनोखा निषेध आणि आभारही!
सामाजिक

शिवाजी कोण होता?’ वाचण्यासाठी संगमनेरकर रस्त्यावर; आमदार गायकवाडांचा ‘वंचित’कडून अनोखा निषेध आणि आभारही!

आमदार गायकवाड यांनी या पुस्तकाला विरोध केल्यामुळे आणि त्यावर आक्षेप घेतल्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये या पुस्तकाविषयी मोठे कुतूहल निर्माण झाले आहे. जे पुस्तक अनेकांनी वाचले नव्हते, ते आता गायकवाडांच्या विरोधामुळे शोधून वाचले जात आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास आणि त्यांचे सर्वसमावेशक विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. संगमनेरच्या सय्यद बाबा चौकात कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे जाहीर वाचन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला, मात्र याचवेळी आंदोलकांनी गायकवाड यांचे उपरोधिक आभार मानल्याने या विषयाची शहरात मोठी चर्चा रंगली आहे.

वंचित बहुजन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने सोमवारी सायंकाळी संगमनेर येथील बहुचर्चित ठरलेल्या शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या वाचन चळवळीतून इतिहासाचा जागर करण्यात आला.

सय्यद बाबा चौकात आयोजित या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कॉम्रेड पानसरे यांच्या पुस्तकातील महत्त्वाच्या अंशांचे वाचन करण्यात आले. शिवरायांचे स्वराज्य हे केवळ एका धर्माचे नसून ते रयतेचे राज्य होते आणि त्यांच्या सैन्यात सर्वधर्मीय मावळे खांद्याला खांदा लावून लढले, हा विचार यावेळी मांडण्यात आला. स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत महापुरुषांचा इतिहास हा अफवांवरून नव्हे तर अस्सल पुराव्यांवर आधारित साहित्यातूनच समजून घेतला पाहिजे, असा सूर आळवला. महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवणे काळाची गरज असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध करताना वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी एक वेगळीच भूमिका मांडली. आमदार गायकवाड यांनी या पुस्तकाला विरोध केल्यामुळे आणि त्यावर आक्षेप घेतल्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये या पुस्तकाविषयी मोठे कुतूहल निर्माण झाले आहे. जे पुस्तक अनेकांनी वाचले नव्हते, ते आता गायकवाडांच्या विरोधामुळे शोधून वाचले जात आहे. पुस्तकाचा खप मोठ्या प्रमाणावर वाढला असून लोक आता स्वतःहून खरा इतिहास जाणून घेण्यासाठी पुढे येत आहेत. गायकवाड यांनी अजाणतेपणी का होईना, पण या पुस्तकाची मोठी जाहिरातच केली आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असा उपरोधिक टोला यावेळी कार्यकर्त्यांनी लगावला.

या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये केवळ राजकीय कार्यकर्तेच नव्हे तर स्थानिक मुस्लिम बांधव आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवरायांचे विचार हे समाजाला तोडणारे नसून जोडणारे आहेत, हेच या सर्वधर्मीय उपस्थितीवरून दिसून आले.

या जाहीर वाचन कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा, तालुका व शहर स्तरावरील अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने संदीप मोकळ, गोरख जगताप, अजिजभाई ओहरा, ॲड. नइम इनामदार, ॲड. कॉम्रेड ज्ञानदेव सहाने, बाबा मोकळ, दत्ता ढगे, रजत अवसक, आवेज खान, आनिस शेख, शकील पेंटर आणि सलिम बागवान यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 500
आंदोलन पुस्तक वाचन वंचित बहुजन आघाडी शिवाजी कोण होता
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar19/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आणि उत्साहवर्धक राहील. कार्यक्षेत्रात नवीन संधी…

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.