Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बुधवार, ०५ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 5, 2026

धुळ्यात ४० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर आणि पोलीस शिपाई रंगेहात जाळ्यात; तळेकर काही काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्यात होते कार्यरत

August 4, 2026

रोटरी क्लबच्या निवडी जाहीर, यांचा झाला पदग्रहण समारंभ

August 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शेतकऱ्यांची गैरसोय न थांबल्यास संगमनेर तहसील कार्यालयासमोर ‘घंटानाद आंदोलन’, वंचित बहुजन आघाडीचा इशारा
आंदोलन

शेतकऱ्यांची गैरसोय न थांबल्यास संगमनेर तहसील कार्यालयासमोर ‘घंटानाद आंदोलन’, वंचित बहुजन आघाडीचा इशारा

पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 4, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

संगमनेर:

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, फार्मर आयडी आणि ई-केवायसी (e-KYC) कामासाठी संगमनेर तहसील कार्यालयात येणाऱ्या ग्रामीण भागातील वयोवृद्ध शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. गेल्या १० ते १५ दिवसांपासून ई-केवायसी डेस्कवरील संबंधित कर्मचारी नियमित उपस्थित राहत नसल्याने शेतकऱ्यांना तासंनतास ताटकळत राहावे लागत असून त्यांची कामे प्रलंबित राहत आहेत. ही गैरसोय तातडीने न थांबल्यास तहसील कार्यालयासमोर तीव्र ‘घंटानाद आंदोलन’ छेडले जाईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील ६० ते ७० वयाचे शेतकरी दररोज तहसील कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. मात्र, या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांकडे अकोले येथील अतिरिक्त कार्यभार असल्याचे सांगून वेळ मारून नेली जात आहे. कर्मचारी जागेवर उपलब्ध नसल्यामुळे ई-केवायसी वेळेत पूर्ण न झाल्यास शेतकरी कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

तहसील कार्यालयातील ई-केवायसी व फार्मर आयडी डेस्कसाठी तातडीने पूर्णवेळ कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, अतिरिक्त चार्जचा पर्याय शोधून काम सुरळीत करावे आणि प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण कराव्यात, अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. या गंभीर समस्येवर प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी, अन्यथा होणाऱ्या तीव्र आंदोलनाला व परिणामांना प्रशासनच जबाबदार असेल, असे वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले आहे.

तालुकाध्यक्ष संपतराव कोळेकर, जिल्हा उपाध्यक्ष आजिज ओहरा, तालुका महासचिव बाबासाहेब मोकळ, तालुका सचिव संदीपराव भोसले आणि युवा शहराध्यक्ष अरबाज शेख यांच्यासह पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 280
घंटानाद आंदोलन निवेदन वंचित बहुजन आघाडी शेतकरी केवायसी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये कथित पाकिस्तानी ‘ग्लोरी’ क्रीम विक्रीप्रकरणी शिवसेना आक्रमक; तपासात दिरंगाई झाल्यास करणार ‘असे काही’!

August 4, 2026

नाशिक-पुणे रेल्वेसाठी ९ ऑगस्टला महामार्गावर चक्काजाम; आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून जनआंदोलनाची हाक

July 31, 2026

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; सरकारच्या निषेधार्थ मशाल मोर्चात संगमनेरकर एकवटले, रस्त्यावर उतरले; बाळासाहेब थोरातांसह सर्व समविचारी पक्षीयांचा समावेश

July 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

बुधवार, ०५ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By अनंत पांगारकरAugust 5, 20260

आजचे राशिभविष्य  मेष – आजचा दिवस तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये सकारात्मकता घेऊन येईल. जोडीदारासोबतचा संवाद सुधारेल…

धुळ्यात ४० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर आणि पोलीस शिपाई रंगेहात जाळ्यात; तळेकर काही काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्यात होते कार्यरत

August 4, 2026

रोटरी क्लबच्या निवडी जाहीर, यांचा झाला पदग्रहण समारंभ

August 4, 2026

सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं

August 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.