Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
आंदोलन

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

लोडशेडिंग रद्द करावे यासाठी डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसकडून सातत्याने आंदोलने करून पाठपुरावा केला जात आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/09/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –

तालुक्यातील धांदरफळ पंचक्रोशीसह परिसरात मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अपुऱ्या आणि खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. सातत्याने निवेदने देऊनही महावितरणकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज धांदरफळ खुर्द येथील सबस्टेशनवर धडक देत जोरदार आक्रोश मोर्चा काढला. महावितरणच्या चुकीच्या नियोजनामुळे शेती पिकांचे नुकसान होत असून शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी जीव मुठीत धरून शेताला पाणी द्यावे लागत असल्याने आंदोलकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

सबस्टेशनवर जमलेल्या शेतकरी आणि युवकांच्या शिष्टमंडळाने वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना आपल्या विविध समस्यांचा पाढा वाचून दाखवला व थेट निवेदन सुपूर्द केले. या प्रसंगी उपकार्यकारी अभियंता रमेश घुगे, ज्युनिअर इंजिनिअर पवार तसेच अधिकारी सातभाई साहेब यांच्यासमोर शेतकऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

सध्या शेतीसाठी मिळणारी थ्री-फेज वीज ही रात्री ९:४५ ते पहाटे ५:४५ या वेळेत दिली जात आहे. ग्रामीण भागात वन्य प्राण्यांचा मोठा वावर असताना भरअंधारात शेताला पाणी देणे शेतकऱ्यांच्या जिवावर बेतणारे ठरत आहे. त्यातच दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत केवळ ग्रामीण भागातच लोडशेडिंग केले जात असल्यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

या आक्रोश मोर्चामध्ये धांदरफळ खुर्द, धांदरफळ बुद्रुक, निमगाव, निमगाव बुद्रुक, पेमगिरी, नांदुरी, सांगवी, कवठे आणि निमज या गावांतील शेतकरी व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महावितरणने येत्या आठ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न केल्यास आणि लोडशेडिंगच्या वेळेत बदल न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. शेतकऱ्यांचा हा रोष पाहून उपकार्यकारी अभियंता रमेश घुगे यांनी पुढील आठ दिवसांच्या आत वीजपुरवठ्याशी संबंधित सर्व समस्या सोडवण्याचे ठोस आश्वासन उपस्थितांना दिले.

लोडशेडिंग बंद करण्यासाठी काँग्रेसचा सातत्याने पाठपुरावा- तालुक्यात दररोज सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत होणाऱ्या लोडशेडिंगमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास, शेतकऱ्यांची कामे आणि पशुपालकांची गोठ्यातील कामे पूर्णपणे खोळंबत आहेत. ही गैरसोय थांबवून लोडशेडिंग रद्द करावे यासाठी डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसकडून सातत्याने आंदोलने करून पाठपुरावा केला जात आहे. शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने व सुरळीत वीजपुरवठा मिळावा ही मागणी सातत्याने लावून धरली जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 156
आंदोलन धांदरफळ सब स्टेशन भारनियमन महावितरण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – तालुक्यातील धांदरफळ पंचक्रोशीसह परिसरात मागील अनेक दिवसांपासून सुरू…

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.