मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध
चंद्रकांत खैरे यांनी निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर आणि कारभारावर जोरदार हल्ला चढवला.


आंदोलनाला संबोधित करताना माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर आणि कारभारावर जोरदार हल्ला चढवला. देशातील लोकशाही मूल्यांची पायमल्ली केली जात असून मतदार याद्यांमधील कथित अनियमितता आणि ‘एसआयआर’च्या नावाखाली होणाऱ्या घोळाबाबत निवडणूक आयोगाने तात्काळ जनतेसमोर स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभारावर त्यांनी कडाडून टीका केली.



