Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रोटरी क्लबच्या निवडी जाहीर, यांचा झाला पदग्रहण समारंभ
महाराष्ट्र संवाद विशेष

रोटरी क्लबच्या निवडी जाहीर, यांचा झाला पदग्रहण समारंभ

आमदार सत्यजित तांबे यांनी रोटरी आय केअर हॉस्पिटलसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रोटरी क्लबच्या निवडी जाहीर, यांचा झाला पदग्रहण समारंभ

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर:

रोटरी क्लब ऑफ संगमनेरच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आले असून अध्यक्षपदी समीर शाह, सचिवपदी संकेत काजळे तर खजिनदारपदी मोहित मंडलिक यांचा पदग्रहण सोहळा रविवारी (२ ऑगस्ट) पार पडला. 

सामाजिक बांधिलकी जपत सेवा, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ संगमनेरच्या ४३ व्या पदग्रहण समारंभ सोहळ्यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे प्रांतपाल जयेशभाई पटेल, आमदार सत्यजित तांबे, उद्योजक राजेश मालपाणी आणि सहाय्यक प्रांतपाल भागनाथ काटे आदी मान्यवर प्रमुख म्हणून उपस्थित होते. या

सोहळ्यात मागील वर्षाचे अध्यक्ष विश्वनाथ मालाणी व सचिव सौरभ म्हाळस यांनी नूतन पदाधिकाऱ्यांकडे पदाची सूत्रे सुपूर्द केली. तसेच नूतन बोर्ड ऑफ डायरेक्टर्स यांचाही पदग्रहण सोहळा पार पडला.

नूतन अध्यक्ष समीर शाह यांनी आपल्या मनोगतात आगामी वर्षातील सेवा प्रकल्पांची माहिती देताना शैक्षणिक क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा संकल्प व्यक्त केला. सोयी-सुविधांपासून वंचित असलेल्या शाळांमध्ये डिजिटल बोर्ड, ग्रीन बोर्ड, हॅन्डवॉश स्टेशन, विद्यार्थ्यांसाठी शूज आणि ग्रंथालयांसाठी पुस्तके पुरवण्याचे उपक्रम राबवले जातील. याशिवाय रोटरी आय केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून डोळ्यांच्या आरोग्यासाठी विविध सेवा प्रकल्प प्रभावीपणे राबवून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत रोटरीची सेवा पोहोचवण्यासाठी संपूर्ण टीम कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी सामाजिक बांधिलकीचा आदर्श जपत अध्यक्ष समीर शाह व त्यांच्या परिवारातर्फे गरजू शालेय विद्यार्थ्यांसाठी ३०० बुटांच्या जोड्यांचे वितरण करण्यात आले, तर सचिव संकेत काजळे व त्यांच्या परिवारातर्फे रोटरी आय केअर हॉस्पिटलसाठी वॉशिंग मशीन भेट देण्यात आले. सोहळ्यात रोटरी क्लबमध्ये नव्याने सहभागी झालेल्या सदस्यांचेही स्वागत करण्यात आले.

आमदार सत्यजित तांबे यांनी रोटरी आय केअर हॉस्पिटलसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. रोटरीने शहरातील एखादा महत्त्वाचा नागरी प्रश्न हाती घेऊन तो पूर्णपणे मार्गी लागेपर्यंत काम करावे आणि नगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

उद्योजक राजेश मालपाणी यांनी रोटरीच्या कार्यशैलीचे कौतुक करताना ही संस्था समाजातील गरज ओळखणारी संवेदनशील शक्ती असल्याचे नमूद केले आणि मालपाणी परिवार यापुढेही नेहमीप्रमाणे सक्रिय सहभाग व सहकार्य देत राहील अशी ग्वाही दिली.

प्रांतपाल जयेशभाई पटेल यांनी डिस्ट्रिक्टच्या आगामी वर्षातील महत्त्वाकांक्षी उपक्रमांची माहिती देताना शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम उपलब्ध करून देणे, वर्षभरात २० हजारांहून अधिक मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे आणि दुर्गम भागातील शाळांमध्ये मुलींच्या आरोग्यासह स्वच्छतागृहांची उभारणी करण्याच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. त्यांनी समाजातील उद्योजक व दानशूर व्यक्तींना या सेवाकार्यात आर्थिक योगदान देण्याचे आवाहन केले.

या सोहळ्यात शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, रोटरी सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विनायक नागरे व भारतभूषण नावंदर यांनी केले, तर सचिव संकेत काजळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी क्लब ऑफ संगमनेरच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 663
निवड पदग्रहण रोटरी क्लब
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

By Annant Ppangarkar19/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेला…

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.