Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये कथित पाकिस्तानी ‘ग्लोरी’ क्रीम विक्रीप्रकरणी शिवसेना आक्रमक; तपासात दिरंगाई झाल्यास करणार ‘असे काही’!

August 4, 2026

शेतकऱ्यांची गैरसोय न थांबल्यास संगमनेर तहसील कार्यालयासमोर ‘घंटानाद आंदोलन’, वंचित बहुजन आघाडीचा इशारा

August 4, 2026

डॉ. मीरा ढास यांनी शिर्डी उप माहिती कार्यालयाच्या माहिती अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला

August 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये कथित पाकिस्तानी ‘ग्लोरी’ क्रीम विक्रीप्रकरणी शिवसेना आक्रमक; तपासात दिरंगाई झाल्यास करणार ‘असे काही’!
राजकारण

संगमनेरमध्ये कथित पाकिस्तानी ‘ग्लोरी’ क्रीम विक्रीप्रकरणी शिवसेना आक्रमक; तपासात दिरंगाई झाल्यास करणार ‘असे काही’!

पोलिसांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद असली तरी प्रशासनाने यात वेळकाढूपणा केल्यास शिवसेना सर्व हिंदुत्ववादी संघटनांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र लोकआंदोलन उभारेल
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 4, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर:

संगमनेर शहरातील एका व्यावसायिकाकडे पाकिस्ताननिर्मित कथित ‘ग्लोरी’ ब्रँडच्या सौंदर्यवर्धक क्रीमची विक्री होत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, देशाची सुरक्षा, स्वाभिमान आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना (शिंदे गट) शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी केली आहे. 

सूर्यवंशी यांनी या प्रकरणाचा छडा लावणाऱ्या संगमनेर शहर पोलिसांच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल पोलिसांचे विशेष अभिनंदनही केले आहे. तसेच प्रशासनाने या गंभीर प्रकरणाच्या तपासात वेळ काढूपणा केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले की, कथितरित्या पाकिस्तानमध्ये उत्पादित झालेल्या या क्रीमची विक्री होणे अत्यंत गंभीर बाबी असून यामागे मोठी वितरण साखळी असण्याची दाट शक्यता आहे. सौंदर्यवर्धक म्हणून विकल्या जाणाऱ्या या ‘ग्लोरी’ क्रीममध्ये अतिघातक रसायनांचा वापर केला जात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

अशा उत्पादनांमुळे त्वचारोग, गंभीर अ‍ॅलर्जी आणि त्वचेचे कायमस्वरूपी नुकसान तर होतेच, शिवाय दीर्घकाळ वापर केल्यास मूत्रपिंड (किडनी) व इतर महत्त्वाच्या अवयवांवर विपरीत परिणाम होण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या उत्पादनांची आयात प्रक्रिया, परवानग्या आणि गुणवत्ता प्रमाणपत्रांची अन्न व औषध प्रशासनाने तातडीने तपासणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी.

सूर्यवंशी यांनी सांगितले की, राष्ट्रीय हित आणि जनहिताच्या या प्रश्नावर शिवसेना गप्प बसणार नाही. पोलिसांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद असली तरी प्रशासनाने यात वेळकाढूपणा केल्यास शिवसेना सर्व हिंदुत्ववादी संघटनांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र लोकआंदोलन उभारेल. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन निवेदनाच्या प्रती स्थानिक आमदार अमोल खताळ पाटील, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त (मुंबई) आणि अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवण्यात आल्या आहेत.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 240
आंदोलन इशारा निवेदन विनोद सूर्यवंशी शिवसेना शिंदे गट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

शेतकऱ्यांची गैरसोय न थांबल्यास संगमनेर तहसील कार्यालयासमोर ‘घंटानाद आंदोलन’, वंचित बहुजन आघाडीचा इशारा

August 4, 2026

नाशिक-पुणे रेल्वेसाठी ९ ऑगस्टला महामार्गावर चक्काजाम; आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून जनआंदोलनाची हाक

July 31, 2026

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरमध्ये कथित पाकिस्तानी ‘ग्लोरी’ क्रीम विक्रीप्रकरणी शिवसेना आक्रमक; तपासात दिरंगाई झाल्यास करणार ‘असे काही’!

By अनंत पांगारकरAugust 4, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहरातील एका व्यावसायिकाकडे पाकिस्ताननिर्मित कथित ‘ग्लोरी’ ब्रँडच्या सौंदर्यवर्धक क्रीमची…

शेतकऱ्यांची गैरसोय न थांबल्यास संगमनेर तहसील कार्यालयासमोर ‘घंटानाद आंदोलन’, वंचित बहुजन आघाडीचा इशारा

August 4, 2026

डॉ. मीरा ढास यांनी शिर्डी उप माहिती कार्यालयाच्या माहिती अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला

August 4, 2026

मंगळवार, ०४ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.