Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम; सव्वाशे पदकांसह उपविजेतेपदावर कोरले नाव

07/10/2026

तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एक फोन आणि सोयाबीनला ४ हजार रुपयांची मदत; दुष्काळात शेतकऱ्यांना जाणवू लागली अनुभवी नेतृत्वाची उणीव

07/10/2026

बुधवार, ०७ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल

07/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भाजपचे पाय आणखी खोलात, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेना बविआ कार्यकर्त्यांनी पाच कोटींसह रंगेहात पकडलं
निवडणूक

भाजपचे पाय आणखी खोलात, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेना बविआ कार्यकर्त्यांनी पाच कोटींसह रंगेहात पकडलं

एवढी मोठी रक्कम घेऊन तावडे हॉटेलमध्ये काय करत होते?
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/11/2024Updated:19/11/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी

मुंबई – १९ नोव्हेंबर

सत्यवचनाच्या आणि सुचिर्भुततेच्या गप्पा मारणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे पाय आणखी खोलात गेले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना विरारमधील एका हॉटेलात पैसे वाटताना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रांगेहाथ पकडलं. 

तावडे हे विरारमधील एका हॉटेलमध्ये ५ कोटी रुपये घेऊन आले होते. ही माहिती भाजपच्याच एका नेत्याने आपल्याला दिल्याचा दावा बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. यामुळे भाजपची देशभर नाचक्की झाली आहे. निवडणूक आयोग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामे सुरु केले आहेत. बटेंगे तो कटेंगेच्या संकटाची तलवार समोर दिसत असताना अचानक हे प्रकरण पुढे आल्याने भाजपची बोलती बंद झाली आहे.

विनोद तावडे हे आज मंगळवारी विरार पूर्वेला असणाऱ्या मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये आले होते. त्यावेळी भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी हॉटेलमध्ये आले होते. त्यांच्यात बैठक सुरु होती, या हालचाली आणि पैसे वाटपाची खबर बविआ प्रमुख हितेंद्र ठाकूर यांना भाजपच्याच एका नेत्याने दिली. यासरशी बविआचे कार्यकर्ते मोठया संख्येने विवांत हॉटेलच्या परिसरात धडकले त्यांनी हाटेलचे सर्व दरवाजे बंद करत हॉटेलमध्ये शोधाशोध सुरु केली. इतक्यात भाजपचेही कार्यकर्ते विवांत परिसरात जमा झाले. आक्रमक बविआ कार्यकर्त्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर दोन्ही बाजूनी हाणामारी सुरु झाली.

विनोद तावडे यांना जेव्हा पैसे वाटताना पकडण्यात आले तेव्हा त्यांनी आपल्याला २५ फोन करत विनवणी देखील केली असल्याचं हितेंद्र ठाकूर म्हणाले. ‘मला माफ करा, मला जाऊ द्या’ अशी विनवणी तावडे आपणास करत होते असं हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केलं.

ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. आचारसंहितेचे पालन करण्यासाठी तयार करण्यात आलेले निवडणूक यंत्रणेचे भरारी पथकही घटनास्थळी पोहोचले. फ्लाइंग स्क्वॉडने परिसराचा आढावा घेतला आणि संबंधित कायद्यानुसार एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे, असं स्पष्टीकरण अति. मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी दिलं

आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनीसुद्धा या प्रकाराबद्दल माध्यमांच्या प्रतिनिधींकडे प्रतिक्रिया व्यक्त केलीय. विनोद तावडे विवांता हॉटेलमध्ये ५ कोटी रुपये घेऊन आले होते. पोलीस हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना दोन डायऱ्याही सापडल्या. विनोद तावडे तिकडे बैठक सुरू असल्याचं सांगत आहेत. पण मतदानापूर्वी ४८ तास आधी बाहेरच्या नेत्यांनी मतदारसंघ सोडायचे असतात हे भाजपाच्या राष्ट्रीय नेत्याला माहिती नाही का? एवढी अक्कल तावडेंना नाही का? विनोद तावडे यांनी याठिकाणी वाटण्यासाठी पाच कोटी रुपये आणले होते. आता पोलीस या प्रकरणात काय करणार, हे बघायचं आहे, असंही हितेंद्र ठाकूर म्हणाले.

भाजपचे राज्य व राष्ट्रस्तरावरील मोठे नेते, माजी मंत्री विनोद तावडे यांच्यावर मतदानाच्या एक दिवस आधी ५ कोटी रुपयांची कॅश रंगेहात पकडलं जाणं हे अत्यंत गंभीर आहे. एवढी मोठी रक्कम घेऊन तावडे हॉटेलमध्ये काय करत होते? त्यांच्या पकडल्या गेलेल्या डायरीत अशा कोणाकोणाला पैसेवाटप झाले आहेत?… pic.twitter.com/d0sigpEajY

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 19, 2024

भाजपाचे राज्य व राष्ट्रस्तरावरील मोठे नेते, माजी मंत्री विनोद तावडे यांच्यावर मतदानाच्या एक दिवस आधी ५ कोटी रुपयांची कॅश रंगेहात पकडलं जाणं हे अत्यंत गंभीर आहे. एवढी मोठी रक्कम घेऊन तावडे हॉटेलमध्ये काय करत होते? त्यांच्या पकडल्या गेलेल्या डायरीत अशा कोणाकोणाला पैसेवाटप झाले आहेत? अडीच तास उलटूनही कोणतीच कारवाई का झालेली नाही?” – जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,081
आचार संहिता भंग भाजप विनोद तावडे हितेंद्र ठाकूर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
क्रिडा व कला

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम; सव्वाशे पदकांसह उपविजेतेपदावर कोरले नाव

By Annant Ppangarkar07/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सातारा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत संगमनेरच्या गीता परिवाराच्या विद्यार्थ्यांनी…

तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एक फोन आणि सोयाबीनला ४ हजार रुपयांची मदत; दुष्काळात शेतकऱ्यांना जाणवू लागली अनुभवी नेतृत्वाची उणीव

07/10/2026

बुधवार, ०७ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल

07/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.