Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज रविवार, ३० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

30/08/2026

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आजी-माजी महसूलमंत्र्यांसह मातब्बरांच भवितव्य मतदान यंत्रात बंद, २३ तारखेला ठरणार किल्लेदार!
निवडणूक

आजी-माजी महसूलमंत्र्यांसह मातब्बरांच भवितव्य मतदान यंत्रात बंद, २३ तारखेला ठरणार किल्लेदार!

23 तारखेकडे लक्ष
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/11/2024No Comments4 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर – अनंत पांगारकर 

बुधवारी झालेल्या मतदानात नगर जिल्ह्यात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार आशुतोष काळे, आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड, आमदार राम शिंदे, आमदार रोहित पवार, आमदार संग्राम जगताप, आमदार लहू कानडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार मोनिका राजळे आदी प्रमुख उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.

२३ नोव्हेंबरला एकाच वेळी सर्व मतदारसंघात मतमोजणी होणार असून त्यानंतर राज्याबरोबरच जिल्ह्याचे चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील काही मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीच्या लढती झाल्या. तर आठ मतदारसंघात बंडखोरी झाल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीचा कस लागणार आहे.

सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्य, माजी महसूल मंत्री असलेले बाळासाहेब थोरात संगमनेरमधून सलग नवव्यांदा तर महसूल मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील आठव्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहे. या दोन नेत्यांची राज्यातील प्रतिष्ठा या निवडणुकीत पणास लागली आहे.

अशा झाल्या लढती…

अकोले मतदारसंघातून आमदार डॉ. किरण लहामटे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट), माजी आमदार वैभव पिचड (बंडखोर भाजप), अमित भांगरे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) यांच्यात प्रामुख्याने लढत झाली. याशिवाय मारुती मेंगाळ आणि मधुकर तळपाडे हेदेखील निवडणूक रिंगणात होते. संगमनेर तालुक्यातील पठार भाग असलेल्या बोटा गटाची साथ कोणाला मिळते, आमदार बाळासाहेब थोरात कोणासोबत राहतात यावर येथील उमेदवाराचा विजय निश्चित असेल.

संगमनेर विधानसभा मतदारसंघातून आमदार बाळासाहेब थोरात नवव्यांदा निवडणूक लढवत आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील पराभवानंतर डॉ. सुजय विखे यांनी या मतदारसंघातून थोरात यांच्या विरोधात उमेदवारी करणार असल्याचे सांगत मतदारसंघात सभांच्या माध्यमातून वातावरण निर्मिती केली होती. मात्र त्यांच्या एका सभेत भाजपाच्या वाचाळविराने केलेल्या वक्तव्यानंतर या मतदारसंघातील चित्र पूर्णत: बदलले आणि विखे यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे गेल्याने या जागेवर विखे यांनी आपल्या समर्थक असलेल्या अमोल खताळ यांना उमेदवारी दिली. खताळ थोरात यांना कितपत लढत देता यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. अन्यथा थोरात यांच्यासाठी ही निवडणूक एकतर्फी मानली जाते.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे आणि महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार यांच्या सरळ लढत आहे. या दोन्ही आमदारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हा विकास आघाडी करून काँग्रेसच्या तिकिटावर या मतदारसंघातील माजी आमदार चंद्रभान घोगरे यांच्या सुनबाई प्रभावती घोगरे यांच्यात लढत होत आहे. तर विखे यांना या मतदारसंघात बंडखोरीचा सामना करावा लागत असून भाजपाचे राजेंद्र पिपाडा यांनी केलेली बंडखोरी त्यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरणार आहे.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात मोठी उलथापालथ असून या मतदारसंघाचे विद्यमान आमदार लहू कानडे यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करत उमेदवारी मिळविली. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसने हेमंत ओगले यांना उमेदवारी दिली असून या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे देखील मैदानात उतरले आहे. तिरंगी लढतीत काय होईल हे निकालानंतर स्पष्ट होईल.

कोपरगाव मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात सरळ लढत होत आहे. अजित पवार यांच्या काँग्रेसकडून विद्यमान आमदार आशुतोष काळे तर शरद पवार यांच्याकडून संदीप वर्पे मैदानात उतरले आहे. सरळ लढतीत कोण बाजी मारेल हे शनिवारी समोर येईल.

राहुरी विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून माजी मंत्री आमदार प्राजक्ता तनपुरे आणि महायुती भाजपकडून शिवाजी कर्डिले यांच्यात लढत होत आहे. हा मतदारसंघ देखील महत्त्वाच्या मतदारसंघ गणला जातो. या मतदारसंघातून हे माजी खासदार सुजय विखे उमेदवारीसाठी इच्छुक होते मात्र नंतर त्यांनी या मतदारसंघावरील आपला दावा सोडून दिल्यावर कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली.

पारनेर मतदार संघात नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून काशिनाथ दाते निवडणूक लढवत आहे.

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून आमदार बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते महायुतीकडून तर त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून अनुराधा नागवडे निवडणूक लढवत आहे. येथे माजी आमदार राहुल जगताप, घनश्याम शेलार, सुवर्णा पाचपुते हेही अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत.

नेवासे विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार चंद्रशेखर गडाख निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांना शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी दिली आहे तर या मतदारसंघातून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी देखील बंडखोरी करत उमेदवारी केली आहे.

शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रताप ढाकणे यांच्या सर्व लढत होत आहे. या लढतीकडे देखील जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

याशिवाय जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण गणल्या जाणाऱ्या अहमदनगर शहर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अभिषेक कळमकर एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहे. हा मतदारसंघ देखील राज्यात महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,173
अहिल्यानगर विधानसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

तुकाराम मुंडेंचा आदेश अन् अहिल्यानगरमध्ये धडक कारवाई! नामांकित ब्रँड्सचे लाखो रुपयांचे अन्नपदार्थ जप्त

03/06/2026

लाखाची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक नाशिकमधून अटक; पदोन्नती होऊन बदली होताच एसीबीची कारवाई

28/05/2026

अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात सराव दरम्यान हँडग्रेनेडचा स्फोट; चार प्रशिक्षणार्थी जवान जखमी

25/05/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज रविवार, ३० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar30/08/20260

आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस नवीन संधी आणि आनंदाच्या बातम्या घेऊन येईल. अनुभवी व्यक्तीचे…

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.