Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विरोधी पक्षनेते पद मिळणार नसल्याने विधिमंडळात फार मोठी लढाई होणार नाही मात्र… विरोधी पक्षनेते पदावरून पृथ्वीराज चव्हाण यांचे विधान
राजकारण

विरोधी पक्षनेते पद मिळणार नसल्याने विधिमंडळात फार मोठी लढाई होणार नाही मात्र… विरोधी पक्षनेते पदावरून पृथ्वीराज चव्हाण यांचे विधान

पक्ष करणार पराभवावर आत्मचिंतन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – कराड 

विधानसभेत आम्हाला विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही. त्यामुळे विधिमंडळात फार मोठे लढाई होणार नसली तरी लोकांचे प्रश्न पत्रकार परिषद आणि बैठकांच्या माध्यमातून मांडण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

राज्यात महायुती सरकारला स्पष्ट जनादेश मिळाला – तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते पद मिळेल एवढी आमदार संख्या देखील महाविकास आघाडीतील एकही पक्षाला मिळालेली नाही. विरोधी पक्षनेते पदासाठी सभागृहाच्या एकूण संख्याबळाच्या एक दशांश सदस्य असणे आवश्यक असते. त्यामुळे विधानसभेत विरोधी पक्षनेते पदासाठी २९ सदस्यांचे संख्याबळ आवश्यक असून ते कोणत्याच पक्षाकडे नाही. महाविकास आघाडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) २०, काँग्रेस १६ तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडे १० सदस्यांचे संख्याबळ आहे. महाविकास आघाडीचे एकत्रित संख्याबळ ४६ एवढे होत असले तरी कोणत्याही एका पक्षाकडे २९ सदस्यांचे संख्याबळ नसल्याने यावेळी विरोधी पक्षनेतेपद नसेल, अशी स्थिती उद्भवली आहे.

विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे – विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असतो. लोकसभेमध्ये २०१४ आणि २०१९ मध्ये असाच प्रसंग उद्भवला होता. यूपीएकडे आवश्यक संख्या वर असताना देखील कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेतेपद नाकारण्यात आले होते. हेच सूत्र विधानसभेत महायुती सरकारकडून कायम ठेवले जाईल अशी चिन्हे आहेत.

शरद पवारांशी झालेल्या भेटीवर भाष्य – ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कराड येथे जाऊन पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीबद्दल बोलताना चव्हाण म्हणाले आमच्या भेटीत राजकीय चर्चा झाली. उद्याची रणनीती तात्काळ ठरविता येणार नाही. आम्ही आमच्या नेतृत्वाला विनंती केली आहे की दोन दिवसात काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांची बैठक घ्या आणि तळागाळात काय मत आहे हे जाणून घ्या, असं सांगितलं आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 983
पृथ्वीराज चव्हाण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.