Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लाडक्या बहिणींनी सत्ताधाऱ्यांना तारले मात्र नव्या सभागृहात बहिणींची संख्या झाली कमी… सभागृहात या महिला आमदार
राजकारण

लाडक्या बहिणींनी सत्ताधाऱ्यांना तारले मात्र नव्या सभागृहात बहिणींची संख्या झाली कमी… सभागृहात या महिला आमदार

पुढील निवडणुकीत असतील किमान ९६ महिला आमदार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/11/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार २५ नोव्हेंबर – मुंबई

गेल्या विधानसभेच्या तुलनेत या विधानसभेमध्ये महिला आमदारांची संख्या घटली आहे. एकीकडे सत्ताधारी महायुतीला लाडक्या बहिणींनी भरभरून पाठिंबा देताना स्पष्ट जनादेश दिला असताना दुसरीकडे मात्र सभागृहातील महिला आमदारांची संख्या कमी झाली आहे. विधिमंडळाच्या सभागृहात आता केवळ २१ महिला आमदार दिसणार असून यात सर्वाधिक १४ महिला आमदार भारतीय जनता पक्षाच्या आहे.

केवळ अडीचशे महिला उमेदवार – निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असताना दुसरीकडे मात्र महिला उमेदवारांना नाकारल्याचे समोर येत आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत २८८ जागांसाठी एकूण ४ हजार १३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी २५० च्या आसपास लाडक्या बहिणी उमेदवार होत्या. म्हणजेच एकूण उमेदवाराच्या सहा ते सात टक्केच महिलांना संधी मिळाली. त्यात आता निवडून आलेल्या महिला उमेदवारांची संख्याही ७ टक्क्यांच्या घरातच आहे.

पक्षनिहाय महिला आमदार – विधिमंडळाच्या नव्या सभागृहात निवडणूक निकालानंतर अवघ्या २१ महिला उमेदवार असलेल्या लाडक्या बहिणी यशस्वी ठरल्या आहेत. सर्वाधिक भाजपाच्या १४ महिला आमदारांमध्ये १० महिला आमदार पुन्हा निवडून आले असून भोकरमधील श्रीजया चव्हाण, कल्याण पूर्वमधून सुलभा गायकवाड, वसईममधून स्नेहा पंडित, फुलांब्रीमधून अनुराधा चव्हाण या चौघींचा नव्याने सभागृहात प्रवेश झाला आहे. शरद पवार यांनी आपल्या पक्षाकडून १० महिलांना संधी दिली होती मात्र यातील एकही महिला सभागृहात पोहोचू शकली नाही. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून चार व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दोन तसेच काँग्रेसकडून अवघी एक महिला आमदार झाली आहे.

मागील स्थिती – २०१९ मध्ये भाजपाने १२ महिला उमेदवारांना संधी दिली होती. तर, शिवसेनेने ९, काँग्रेसने १५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ९ महिला उमेदवारांना संधी दिली होती. म्हणजेच मुख्य प्रवाहातील पक्षांनी ४५ महिला उमेदवार उभे केले होते. त्यापैकी फक्त २४ महिला उमेदवार जिंकल्या.

पुढील निवडणुकीत ९६ महिला आमदार अपेक्षित – २८८ सदस्यांच्या विधानसभेत फक्त २४ महिला आमदार म्हणजेच फक्त ८ टक्के महिला आमदार होत्या. तर यावेळी २१ महिला उमेदवार जिंकल्याने ही टक्केवारी ७ टक्क्यांवर आली आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये राज्यात ३३ टक्के महिला आरक्षणाचा ठराव पास करण्यात आला. पुढची जनगणना झाल्यानंतर ३३ टक्के आरक्षणाचे बिल अंमलात येणार आहे. तेव्हा सभागृहात २८८ पैकी ९६ महिला आमदार असणं अपेक्षित असेल. त्यामुळे सभागृहात महिला प्रतिनिधींचा आवाज वाढवण्याकरता आता २०२९ च्या निवडणुकीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मतदारसंघनिहाय सभागृहात दिसणाऱ्या महिला आमदारांची नावे व पक्ष –

चिखली – श्वेता महाले (भारतीय जनता पक्ष) 

जिंतूर – मेघना बोर्डीकर (भारतीय जनता पक्ष) 

नाशिक मध्य – देवयानी फरांदे (भारतीय जनता पक्ष) 

नाशिक पश्चिम – सीमा हिरे (भारतीय जनता पक्ष) 

बेलापूर – नंदा म्हात्रे (भारतीय जनता पक्ष)

दहिसर – मनीषा चौधरी (भारतीय जनता पक्ष)

गोरेगाव – विद्या ठाकूर (भारतीय जनता पक्ष) 

पर्वती – माधुरी मिसाळ (भारतीय जनता पक्ष) 

शेवगाव – मोनिका राजळे (भारतीय जनता पक्ष) 

केज – नमिता मुंदडा (भारतीय जनता पक्ष) 

भोकरी – श्रीजया चव्हाण (भारतीय जनता पक्ष) 

कल्याण पूर्व – सुलभा गायकवाड (भारतीय जनता पक्ष) 

वसई – स्नेहा पंडित (भारतीय जनता पक्ष) 

फुलंब्री – अनुराधा चव्हाण (भारतीय जनता पक्ष) 

साक्री – मंजुळा गावित (शिवसेना एकनाथ शिंदे) 

कन्नड – संजना जाधव (शिवसेना एकनाथ शिंदे) 

अमरावती – सुलभा खोदके (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) 

देवळाली – सरोज अहिरे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) 

अनुशक्ती नगर – सना मलिक (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) 

श्रीवर्धन – आदिती तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)

धावरी – ज्योती गायकवाड (काँग्रेस)

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 757
महिला आमदार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने…

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.