बुधवार २७ नोव्हेंबर
लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळविणाऱ्या काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागल आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात काँग्रेसची पडझड झाल्याने काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलाचे संकेत मिळत आहे.
पटोले राजीनामा देणार देशमुख नवे प्रदेशाध्यक्ष – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा निवडणुकीत अगदी काठावर निवडून आलेले नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत असून त्यांच्या जागी अमित देशमुख यांची निवड केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पटोले यांचा राजीनामा स्वीकारला जाणार असल्याची मोठी बातमी समोर येत असून काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. 
देशमुख लातूरहून विमानाने दिल्लीला – अमित देशमुख यांच्याकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस हाय कमांडच्या आदेशाने अमित देशमुख लातूरहून मुंबईकडे तातडीने विमानाने रवाना झाले आहेत. त्यामुळे येत्या काही तासात काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत.
दिग्गजांचा पराभव – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर आदींसह काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर या बदलांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

