Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विधानसभा निवडणूक होताच अंतर्गत नाराजीचा आगडोंब उसळला, निष्क्रिय आणि गद्दारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची शिवसेनेतून हकालपट्टीची मागणी; वरिष्ठांच्या निर्णयाकडे लक्ष!
राजकारण

विधानसभा निवडणूक होताच अंतर्गत नाराजीचा आगडोंब उसळला, निष्क्रिय आणि गद्दारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची शिवसेनेतून हकालपट्टीची मागणी; वरिष्ठांच्या निर्णयाकडे लक्ष!

ठाकरे गटातील संघर्ष तीव्र
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/11/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार २९ नोव्हेंबर – संगमनेर 

विधानसभा निवडणूक होताच संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत नाराजी समोर येण्यास सुरुवात झाली आहे. पराभवाची मिमांसा करत नव्या जोमाने कामाला लागतानाच निष्क्रिय आणि गद्दारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याची मागणी करणारा ठराव शिवसैनिकांच्या बैठकीत करण्यात आला आहे.

चिंतन बैठक – विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. थोरात यांची पारंपारिक विरोधक असलेली ठाकरेंची शिवसेना यावेळी थोरात यांच्या सोबत असतानादेखील थोरात यांचा पराभव आत्मचिंतन करण्यास लावणारा आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांनी पक्ष आदेशाशी गद्दारी करत मतदार संघात विरोधी काम केले. या पार्श्वभूमीवर गुरुवारी संगमनेरमध्ये शिवसैनिकांची चिंतन बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून काही पदाधिकाऱ्यांची नावे वरिष्ठांना कळविण्यात आली आहे.

यांचा समावेश – शिंदे गटाच्या आमदाराच्या मिरवणुकीत नाचणाऱ्या, पेढे वाटणाऱ्या निष्क्रिय आणि गद्दार पदाधिकाऱ्यांची पक्षातून त्वरित हकालपट्टी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह बैठकीतील ठराव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विभागीय संपर्क नेते जिल्हा संपर्कप्रमुख विधानसभा संपर्कप्रमुख यांच्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हकालपट्टीची मागणी करण्यात आलेल्यामध्ये शहरप्रमुख आप्पा केसेकर, उपशहर प्रमुख बाळू पिडीयार, योगेश बिचकर, विधानसभा संघटक कैलास वाकचौरे यांचा समावेश आहे. तर तालुकाप्रमुख असलेले संजय फड हे या निवडणुकीत निष्क्रिय असल्याचे दिसून आले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांनी कोणतेही काम न केल्याने फड यांनादेखील पदमुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नव्या जोमाने जनसेवा – पराभवाचे आत्मचिंतन करत गद्दारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यासाठी तसेच झालेला पराभव दिसून नव्या जोमाने पुन्हा जनसेवा करण्यासाठी शिवसैनिकांना अमर कतारी यांनी मार्गदर्शन करत कामाला लागण्याचा सल्ला या बैठकीत दिला.

यांची होती उपस्थिती – यावेळी महिला आघाडी तालुकाप्रमुख शितल हासे, उपजिल्हाप्रमुख आशा केदारी, उपतालुकाप्रमुख राजश्री वाकचौरे, रेणुका शिंदे, वैशाली वडतल्ले, शहरप्रमुख संगीता गायकवाड, उपजिल्हाप्रमुख अशोक सातपुते, उपतालुकाप्रमुख सचिन साळवे, युवासेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, संगमनेर व्यापारी आघाडी शहरप्रमुख संभव लोढा, उपशहरप्रमुख वेणुगोपाल लाहोटी, वाहतूक सेना शहर प्रमुख इम्तियाज शेख, युवासेना जिल्हा समन्वयक फैसल सय्यद, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, विभागप्रमुख अल्ताफ मुमताज, विभागप्रमुख परवेज शेख, उपतालुकाप्रमुख संजय सोनवणे, ग्राहक कक्ष तालुकाप्रमुख सदाशिव हासे, उपतालुकाप्रमुख जना नागरे, लक्ष्मण सोन्नर, युवासेना शहरप्रमुख गोविंद नागरे, आरोग्य सेना जिल्हाप्रमुख अजिज मोमीन, उपशहर प्रमुख नारायण पवार, युवासेना तालुका प्रमुख अक्षय गुंजाळ, पठार भाग तालुकाप्रमुख योगेश खेमनर, शिवसेना उपतालुकाप्रमुख एकनाथ खेमनर, युवासेना उपप्रमुख गुलाब कोकाटे, विभाग प्रमुख कयूम शेख, रहीम बेग सलमान शेख, शशिकांत घुले, मयूर ढोकरे, विभाग प्रमुख प्रशांत खजुरे, शाखाप्रमुख प्रकाश चोथवे, ज्येष्ठ शिवसैनिक रंगनाथ फटांगरे, त्रिलोक कतारी, पंकज पडवळ, पठार भागातील शिवसैनिक सुनील घुले, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य विजय सातपुते, माजी तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, पठार भाग उपतालुकाप्रमुख अमित फटांगरे, शिवसेना शहर संघटक पप्पू कानकाटे, ज्येष्ठ शिवसैनिक गणेश धात्रक, आश्वी उपतालुकाप्रमुख प्रकाश गायकवाड, उपतालुकाप्रमुख निलेश गुंजाळ, गटप्रमुख रवी गिरी, शहर समन्वयक असिफ तांबोळी, उपशहर प्रमुख अक्षय गाडे, शिवसेना उपशहर प्रमुख दीपक वन्नम, युवासेना उपजिल्हाप्रमुख वैभव अभंग, माजी युवा सेना तालुकाप्रमुख राजू सातपुते, विभाग प्रमुख जयदेव यादव, शाखाप्रमुख अनिल खुळे, उपतालुकाप्रमुख गोकुळ लांडगे, दत्तात्रय आहेर, रिक्षा सेना शहर प्रमुख अशोक बडे, रवी बढे, सोमनाथ शेंडे, शिवसेना शहर समन्वयक दीपक साळुंखे, युवासेना उपतालुका प्रमुख सागर भागवत, ज्येष्ठ शिवसैनिक हरीश लांडगे, माजी शहरप्रमुख अमर कतारी आदी शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थेत सन्मानाचा वाटा द्या, गद्दारांची हकालपट्टी करा…

आगामी नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत संगमनेर काँग्रेसने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सन्मानाचा वाटा द्यावा अन्यथा शिवसेना स्वबळावर आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवेल, असा ठराव करण्यात आला. तसेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धर्म पाळला. मात्र शिवसेनेच्या काही गद्दारांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धर्म न पाहता बाळासाहेब थोरात यांना शब्द देऊन देखील शिंदे गटाच्या उमेदवाराला मदत होईल असे प्रयत्न केले. त्यामुळे प्रामाणिक शिवसैनिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. काही गद्दारांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अमोल खताळ निवडून आल्यावर पेढे वाटत त्यांचा नागरी सत्कार केला. या सर्वांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी वरिष्ठांकडे करण्यात आली आहे. – अमर कतारी, शिवसेना माजी शहर प्रमुख.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,084
अमर कतारी चिंतन बैठक शिवसेना उद्धव ठाकरे गट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित…

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.