Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निवडणूक प्रक्रियेविरोधात ९५ वर्षीय योद्ध्याचा ‘आत्मक्लेश’ सुरूच, शरद पवारांनी घेतली भेट
महाराष्ट्र संवाद विशेष

निवडणूक प्रक्रियेविरोधात ९५ वर्षीय योद्ध्याचा ‘आत्मक्लेश’ सुरूच, शरद पवारांनी घेतली भेट

... त्याविरोधात आवाज उठविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, ३० नोव्हेंबर 

हल्ली निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाही मूल्य उद्ध्वस्त होत असल्याची टीका ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी केली. तसेच या प्रकाराचा निषेध म्हणून ९५ वर्षीय योद्धा अर्थात डॉ. बाबा आढाव यांनी गुरुवारी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन पुकारले आहे. शनिवारी तिसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरूच होते.

शरद पवारांनी घेतली भेट – दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी सकाळी डॉ. बाबा आढाव यांची भेट घेतली. आढाव यांच्या आंदोलनाला राज्यातून पाठिंबा मिळत असून, डॉ. आढाव यांच्या समर्थनार्थ शनिवारी राज्यातील जिल्ह्यांमध्येही असेच आत्मक्लेश आंदोलन करण्यात येत आहे.

आज उपोषण थांबविणार – डॉ. आढाव यांच्याबरोबरच सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार, गोरख मेंगडे यांनीही आपले उपोषण सुरू ठेवले आहे. ३० नोव्हेंबरला (शनिवारी) उपोषण थांबवणार असल्याचे डॉ. आढाव यांनी जाहीर केले आहे.

सहकारी चिंतेत – वयाच्या ९५ व्या वर्षी डॉ. आढाव यांनी सुरू केलेल्या या उपोषणामुळे कामगार चळवळीतील त्यांचे सहकारी चिंतित असून, त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली जात आहे.

यांनी घेतली भेट – महात्मा गांधी भवनचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, माजी मंत्री, आमदार डॉ. विश्वजीत कदम, ज्येष्ठ नेते मोहन जोशी, रमेश बागवे, किरण मोघे, मेधा थत्ते, भाई संपतराव पवार, धनाजी गुरव व अन्य स्थानिक पदाधिकारी, नेते यांनी उपोषणस्थळी येऊन डॉ. आढाव यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

आत्मक्लेश आंदोलन का…

निवडणूक प्रक्रियेबाबत नागरिकांकडून शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्याचे निराकरण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकार ती पाळत नसेल तर नागरिकांना त्याविरोधात आवाज उठविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, त्यामुळेच हे आत्मक्लेश आंदोलन आहे. – डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ कामगार नेते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 838
आत्मक्लेशआंदोलन बाबा आढाव शरद पवार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
अपघात

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

By Annant Ppangarkar08/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात गुरुवारी दुपारी एक अत्यंत…

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक अहिल्यानगर जिल्ह्यात; शेती व पाणी परिस्थितीचा घेणार आढावा

08/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.