Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक अहिल्यानगर जिल्ह्यात; शेती व पाणी परिस्थितीचा घेणार आढावा

08/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नगर परिषदेच्या वाँटर एटीएमला कोरड… शहरातील वाँटर एटीएम बंद
सामाजिक

नगर परिषदेच्या वाँटर एटीएमला कोरड… शहरातील वाँटर एटीएम बंद

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, ११ डिसेंबर

संगमनेर – संगमनेर नगर परिषदेच्या सहकार्याने शहरातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी नाशिक येथील खासगी संस्थेने सुरू केलेले वाँटर एटीएम गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. यामुळे नागरिकांना खाजगी पाणी पुरवठा करणार्‍या व्यक्तीकडून पाणी घ्यावे लागत आहे. पालिकेची शुद्ध पुरवठा योजना ठेकेदाराला फायदेशीर ठरली आहे

संगमनेर नगर परिषदेच्यावतीने दररोज शहरातील उपनगरात नळाव्दारे पाणी पुरवठा केला जात आहे. निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन टाकुन कायम स्वरूपी हा प्रश्न मार्गी लावला आहे. पिण्यासाठी शुध्द पाणी मिळावे यासाठी प्रवरा नदीजवळ साई मंदिर परिसरात जल शुद्धीकरण प्रकल्प उभारला आहे. तरीही नगर परिषदेने दहा वर्षांपूर्वी नाशिक येथील ‘प्रथमेश एन्टरप्रायजेस’ या संस्थेला शहरात शुद्ध पाणीपुरवठा करण्यास टेंडर दिले. बाजार समितीच्या आवारात असलेल्या नगर परिषदेच्या जनतानगर येथील जलकुंभाच्या जागेत खाजगी आरो प्लांट उभा करण्यात आला आहे. तेथून चारचाकी वाहनातून शहरात उपनगरात वाँटर एटीएममधुन पाणी विकले जाते होते. तर नागरिकांना मोक्याच्या ठिकाणी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी नविन नगर रस्ता, अकोले नाका, गणेश नगर, नेहरू चौक आदिसह इतर महत्त्वाच्या जागी वाँटर एटीएम स्टँड उभारण्यात आले. तेथे पाण्याच्या टाकीत चारचाकी वाहनातून पाणी पुरवठा केला जात होता. तेथून नागरिक नाणे टाकुन पाणी विकत घेत होते.

गेल्या अनेक महिन्यांपासून हे सर्व वाँटर एटीएम स्टँड बंद आहे. तर गणेशनगर येथील वाँटर एटीएम एका बिल्डरने काढून टाकले आहे. चार चाकी वाहनेही बंद करण्यात आली आहे. जनतानगर येथील एकच आरो प्लांट सध्या सुरू आहे. पाणी विकुन नेमकी किती कमाई झाली. पुढे हे वाँटर एटीएम, वाहने का बंद करण्यात आली याबाबत पालिकेकडे माहितीच उपलब्ध नाही. मुदत संपूनही सदर प्रथमेश एन्टरप्रायजेसचे काम सुरू असून पालिकेची फसवणूक केली जात असल्याची माहिती एका माजी नगरसेवकाने दिली.

पालिकेचेही या प्रकरणाकडे दुर्लक्ष झाले असून शहरात नागरिक, भाजी विक्रेते, फेरीवाले, दुकानदार यांना या वाँटर एटीएमचा आधार होता. आता खाजगी पाणी विक्रेते या सर्वाचा फायदा घेत असून पाण्याचे जार विकले जात आहे. पालिकेत सध्या प्रशासक राज असून तीन वर्षे झाली तरी निवडणूका झाल्या नाही. यामुळे कारभार अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हातात आहे. ते कुणाला दाद देत नाही. एकुणच खाजगी ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम सुरू असल्याचा आरोप माजी नगरसेक करत आहे.

ठेकेदार फुकट वापरतोय पाणी…

संबंधित ठेकेदाराची मूदत संपली आहे. पालिकेचे पाणी वापरून पैसे कमविण्याचा उद्योग गेली अनेक वर्षे सुरू होता. सध्या सुरू असलेले जनतानगर येथील आरो प्लांट लबाडीने सुरू आहे. पालिकेचे पाणी वापरण्याच्या बदल्यात कुठलेच शुल्क ठेकेदार भरत नाही. 

अँड. श्रीराम गणपुले, शहराध्यक्ष भाजपा.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 720
वॉटर एटीएम
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

By Annant Ppangarkar08/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून आणि आमदार अमोल खताळ…

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक अहिल्यानगर जिल्ह्यात; शेती व पाणी परिस्थितीचा घेणार आढावा

08/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.