Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले? महिला व बालकल्याण विभागाने थेट पत्रकच काढलं! माजी मंत्री आदिती तटकरे यांनी केला मोठा खुलासा
राजकारण

लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले? महिला व बालकल्याण विभागाने थेट पत्रकच काढलं! माजी मंत्री आदिती तटकरे यांनी केला मोठा खुलासा

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 12, 2024Updated:December 12, 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार १२ डिसेंबर 

मुंबई – विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेसंदर्भात राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने एक पत्रक काढले आहे. योजनेच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या प्रश्नांना माजी महिला व बालकल्याण मंत्री एका ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिल आहे.

लोकसभेला महायुतीला राज्यात मोठं अपयश पाहावं लागलं होतं. परंतु, त्यानंतर राज्यातील महायुती सरकारने राज्यातील महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी ही योजना आणली. महायुतीमधील नेत्यांनी या योजनेचा व त्यामार्फत महायुती सरकारचा जोरदार प्रचार केला गेला. परिणामी महायुतीने राज्याच्या विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी तब्बल २३५ जागा जिंकल्या. विरोधकांनीही लाडकी बहीण योजनेचा निकालावर परिणाम झाल्याचे मान्य केले.

महायुतीला पुन्हा सत्ता मिळवून देण्यात मोलाची मदत करणाऱ्या या योजनेतील काही लाभार्थ्यांना मात्र आता लाभापासून वंचित राहावं लागू शकतं, अशी चर्चा समाजमाध्यमांवर पाहायला मिळत आहे. या योजनेचे निकष आता बदलले जातील, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करून लाखो लाभार्थी महिलांचे अर्ज बाद होतील असे दावे केले जात आहे.

याबाबत राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागाला सातत्याने विचारणा होत आहे. तसेच माजी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना या प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे. अखेर राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने या योजनेबाबत पसरत असलेल्या अफवांचं खडणं केलं आहे.

राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने या योजनेबाबत लोकांमध्ये पसरलेले संभ्रम दूर करणारं एक पत्रक जारी केलं आहे. आमदार आदिती तटकरे यांनी हे पत्रक समाजमाध्यमांवर शेअर केलं आहे. या पत्रकासह तटकरे यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल रील्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे. एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून यावर मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे. तरी, याबाबत समाजमाध्यमांतून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये ही नम्र विनंती”.

https://x.com/iAditiTatkare/status/1866815091145863277?t=RJcuRHy8LgFyqsA9o_8-2w&s=19

महिला व बालकल्याण विभागाने जारी केलेल्या पत्रकात काय म्हटलंय?

महिला व बालकल्याण विभागाने जारी केलेल्या परीपत्रकात म्हटलं आहे की “सर्वांना कळविण्यात येते की राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या असे निर्दशनास आलेले आहे की, मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाजमाध्यमांवर रील्स व व्हिडीओंद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे. यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे. या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तींमध्ये तसेच योजनेच्या सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल. तसेच महिला व बालकल्याण विभागाने वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांना सुचवलं आहे की त्यांनी लोकांधील संभ्रम दूर करावा. सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपलेस्तरावरुन तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी”.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 819
अदिती तटकरे महिला व बालकल्याण विभाग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

By अनंत पांगारकरJune 10, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज | अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील जुने भालगाव येथे नदीच्या पाण्यात बुडून…

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.