Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महाराष्ट्रात भाजपकडून पुन्हा एकदा ‘ऑपरेशन लोटस’?
राजकारण

महाराष्ट्रात भाजपकडून पुन्हा एकदा ‘ऑपरेशन लोटस’?

बावनकुळे, दरेकर यांच्याकडून संकेत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार १२ डिसेंबर 

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महाविकास आघाडीचे काही आमदार खासदार भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात असून भाजपकडून महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस राबवले जाण्याची चिन्ह आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीत भाजप नंबर वनचा पक्ष ठरल्याने महाविकास आघाडीतील आमदार, खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे. या दाव्यामुळे राज्यात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन लोटस’ राबवले जाणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीतील कोणीही भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात नाही, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बावनकुळे यांचा दावा खोडून काढला आहे.

नाना पटोले यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हण यांनी देखील बावनकुळे आणि दरेकर यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. त्या म्हणाल्या की, “महाराष्ट्रातील सरकार मजबूत असले तरी केंद्रातील सरकार मजबूत नाही. त्यांना काही खासदारांची गरज लागेल म्हणून ते अशाप्रकारचे प्रयत्न करत असतील. परंतु त्यांना यश मिळणार नाही. भाजपचे केंद्रातील सरकार चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या कुबड्यावर उभे असून त्या कुबड्या कधीही गळून पडतील या भीतीतून हे सर्व सुरू आहे.”

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे… “महाविकास आघाडीतील काही आमदार, खासदार अस्वस्थ आहेत. पक्षाचे आमच्याकडे दुर्लक्ष होत असून, पक्षाकडून पाठबळ मिळत नाही. मतदारसंघातील परिस्थितीविषयी बैठकांचे आयोजन केले जात नाही, असे मविआतील नाराज आमदार, खासदारांचे म्हणणे आहे. तपास यंत्रणा त्यांचे काम करत असतात. आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही. ईडी, सीबीआयचा वापर केला जातो, हे महाविकास आघाडीच्या लोकांचे नेहमीचे रडगाणे आहे. मात्र, मोदींनी केलेल्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आमच्या पक्षात कोणी आले तर, त्यांचे स्वागत आहे.”

प्रवीण दरेकर म्हणाले… “मविआतील आमदार-खासदार पुढील राजकीय भवितव्याचा विचार करत हालचाली करत आहेत. केंद्रात भाजप युतीचे आणि राज्यात भाजप महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आग्रह, विकास या मुद्द्यावर शरद पवारांच्या पक्षातील लोकप्रतिनिधी आमच्यासोबत येण्याचा विचार करू शकतील.”

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 672
ऑपरेशन लोटस चंद्रशेखर बावनकुळे प्रवीण दरेकर भाजप
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.