Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिंदेंच्या या मंत्र्यांवर गदा, यांना मिळणार संधी…
राजकारण

शिंदेंच्या या मंत्र्यांवर गदा, यांना मिळणार संधी…

काही मंत्र्यांवर पक्षातूनच नाराजी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

प्रवीण पुरो / मुंबई

शुक्रवार १३ डिसेंबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ३.० सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार शनिवारी किंवा रविवारी होण्याची शक्यता आहे. मात्र, महायुतीतील कुठल्या पक्षाला किती खाती मिळणार? कुठली खाती मिळणार? यावरून धाकधूक वाढली आहे. यातच शिंदेंच्या शिवसेनेतून कुणाला संधी मिळणार? याची नावे समोर आली आहेत.

प्राप्त वृत्तानुसार, शिंदेंच्या शिवसेनेला ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रिपदे मिळतील. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जे आमदार मंत्री होते, त्यातील काही जणांना वगळून नव्यांना संधी देण्यात येईल, असंही सांगितलं जातं. संभाव्य मंत्र्यांच्या यादीत भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांचा समावेश असेल. यंदा गोगावले यांची कोट घालण्याची इच्छा पूर्ण होईल असं मानलं जातं. अडीच वर्षांच्या कार्यकाळात शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तापर्यंत दोघांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. या अपेक्षा पूर्ण न झाल्याने अखेरच्या क्षणी गोगावले यांना राज्य परिवहन महामंडळाचे आणि सिरसाट यांना सिडकोचे अध्यक्षपद देण्यात आले होते. याशिवाय आमदार प्रताप सरनाईक आणि आमदार विजय शिवतारे यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते.

शिवसेनेचे संभाव्य कॅबिनेट मंत्री… एकनाथ शिंदे, उदय सामंत, शंभुराजे देसाई, दादा भुसे, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, गुलाबराव पाटील, भरत गोगावले.

संभाव्य राज्यमंत्री… योगेश कदम, विजय शिवतारे, राजेंद्र पाटील यड्रावरकर अथवा प्रकाश आबिटकर

दरम्यान, माजी मंत्री तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, दादा भुसे, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद देण्यास शिवसेनेतील आमदारांनी विरोध केला होता. या नेत्यांकडे गेल्यावर कामच होत नाहीत. हे नेते केवळ आश्वासनं देतात. प्रत्यक्षात काम होत नसल्याचा आरोप आमदार खासगीत करतात. पण, दादा भुसे, गुलाबराव पाटील या दोन नेत्यांची नावे पुन्हा मंत्रिमंडळाच्या संभाव्य यादीत आहेत. त्यामुळे तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,652
एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ शिवसेना शिंदे गट संभाव्य मंत्री
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.