Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भाजपचे हिंदुत्व निवडणुकांपुरते! बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराबाबत मोदी गप्प का? उद्धव ठाकरे
राजकारण

भाजपचे हिंदुत्व निवडणुकांपुरते! बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराबाबत मोदी गप्प का? उद्धव ठाकरे

चंद्रशेखर बावनकुळे यांचेही प्रत्युत्तर
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/12/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार १४ डिसेंबर 

मुंबई : निवडणुका जवळ आल्या की, भाजपला हिंदुत्वाची आठवण होते. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत, तेथील मंदिरे जमीनदोस्त करण्यात येत आहेत. तरीही भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मूग गिळून गप्प का? भाजप आणि नरेंद्र मोदी यांचे हिंदुत्व गेले कुठे? निवडणुका जवळ आल्या की, मतांसाठी भाजपला हिंदुत्व आठवते, अशा तिखट शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. हिंदुत्वावर भाजपची भूमिका काय ते आधी स्पष्ट करावे, असे खुले आव्हानही ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना दिले आहे.

बांगलादेशातील गोरगरीब हिंदूंवर अत्याचार होत आहेत. मुंबईत दादरमधील ८० वर्षे जुने हनुमानाचे मंदिर रेल्वे प्रशासन पाडायला निघाले आहे, आता भाजपचे हिंदुत्व कुठे गेले? हिंदूंच्या मतांवर निवडून आले तर मंदिरे वाचवण्यासाठी काय करणार, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला.

बांगलादेशात इस्कॉन मंदिर जाळले, मात्र भाजप गप्प. संसदेचे अधिवेशन सुरू असून हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा विरोधक जाब विचारताहेत. केंद्रातील सत्ताधारी विरोधकांच्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तरे देत नाहीत. त्यामुळे आता भाजपची हिंदुत्वाची व्याख्या नेमकी काय आहे. तुमचे हिंदुत्व फक्त निवडणुकीत मतांसाठी आहे का? मतांसाठी मतदारांना भयभीत करतात. ‘बटेंगे तो कटेंगे’ अशा घोषणा देतात. परंतु ज्या ठिकाणी काहीच नाही, त्या ठिकाणी या घोषणा दिल्या जात आहेत. फोनवर युक्रेनचे युद्ध थांबले म्हणता तर बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवण्याची धमक दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी मोदींना दिले.

जगभरात फिरायला वेळ,पण खासदारांसाठी नाही!… संसदेत योग्य उत्तरे मिळत नाहीत. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. परंतु ती नाकारली गेली. त्यामुळे मी खासदारांना सांगितले पंतप्रधानांना पत्र द्या. त्यांच्या मागे खूप व्याप आहे. जगभरात फिरायला त्यांना वेळ आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मोदींना लगावला.

आधी हिंदुत्व नंतर ‘वन नेशन, वन इलेक्शन’… केंद्रीय संसदीय अधिवेशनात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ बिल मंजूर झाले. हिंदुत्व फक्त मतांसाठी, घाबरवायचे आणि मते घ्यायची, पण मंदिरे कुठे सेफ आहेत. ईव्हीएम मशीनद्वारे निवडणूक जिंकली. जगातील हिंदू मोदींकडे अपेक्षेने बघताहेत. त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा स्पष्ट करा. त्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करणार, असेही ते म्हणाले.

फोडाफोडीत मंत्रिमंडळ विस्तार लटकला… मुख्यमंत्री कोण? यावर आधी महायुतीत धुसफूस सुरू होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाचा वाद मिटला तर आता मंत्रिमंडळात कोण? यावर महायुतीत एकमत नाही. त्यात भाजपला आणखी आमदार मिळाले की एकहाती सत्ता स्थापन करणे शक्य होईल. त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणात मंत्रिमंडळ विस्तार लटकला, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

मोदींबद्दल बोलण्याची तुमची लायकी नाही

ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलत आहेत. उद्धव ठाकरे तुमचे हिंदूप्रेम किती बेगडी होते हे तुमच्या अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात जनतेने बघितले. पालघरमध्ये झालेले साधूंचे हत्याकांड आणि तुमची हिंदूविरोधी भूमिका महाराष्ट्राने बघितली. यातूनच तुमची हिंदुत्ववादी तथाकथित निष्ठा समजते. त्यामुळे तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाहीच, पण तुमची ती लायकीदेखील नाही. – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष भाजपा. 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 550
उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी भाजप शिवसेना उद्धव ठाकरे गट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

By Annant Ppangarkar13/09/20260

आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी…

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.