Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर न्यायालयाचा मोठा निकाल! वारकऱ्यांच्या दिंडीत कंटेनर घुसवणाऱ्या चालकाला दिली ‘ही’ शिक्षा

07/10/2026

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम; सव्वाशे पदकांसह उपविजेतेपदावर कोरले नाव

07/10/2026

तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एक फोन आणि सोयाबीनला ४ हजार रुपयांची मदत; दुष्काळात शेतकऱ्यांना जाणवू लागली अनुभवी नेतृत्वाची उणीव

07/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » श्रद्धांजली…. अकोले तालुक्याचा आधारवड स्वर्गीय मधुकरराव पिचड
महाराष्ट्र संवाद विशेष

श्रद्धांजली…. अकोले तालुक्याचा आधारवड स्वर्गीय मधुकरराव पिचड

लेखक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून राज्याचे माजी मंत्री आहेत. तसेच ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचे सहकारी आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/12/2024Updated:15/12/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बाळासाहेब थोरात (माजीमंत्री महाराष्ट्र राज्य) 

सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला अकोले तालुका हा पुरोगामी आणि डाव्या विचारांचा. संघर्ष आणि चळवळीतून तयार झालेले मधुकरराव पिचड हे अकोले तालुक्याने राज्याला दिलेले संघर्षशील नेतृत्व. विविध मंत्रिपदाच्या माध्यमातून आदिवासी समाजाकरता राज्यभर मोठे काम उभे करताना जलसिंचनाच्या माध्यमातून अकोले तालुका सुजलाम सुफलाम करण्याचे श्रेय हे तालुक्याचे आधारवड असलेल्या मधुकरराव पिचड साहेबांना जाते.

अकोले आणि संगमनेर तालुका हे भाऊ-भाऊ म्हणून ओळखले जातात. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी या तालुक्यांमध्ये अनेक चळवळी झाल्या आणि त्यामुळे डावी विचारसरणी इथे रुजली. सह्याद्री पर्वतांमध्ये वसलेल्या राजूर गावात मधुकरराव पिचड यांचा जन्म झाला. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी संघर्षातून नेतृत्व घडविले. सुरुवातीला अकोले तालुक्याचे सभापती आणि त्यानंतर ते आमदार झाले. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास, दुग्धविकास व पशूसंवर्धन, वने व सामाजिक वनीकरण, परिवहन, पुनर्वसन आदी मंत्रालय सांभाळताना त्यांनी आदिवासी खात्याला मोठी गती दिली. आदिवासी समाजाकरता राज्यभर मोठे काम केले. मंत्रीपदाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद, विरोधी पक्षनेता अशी पदेही त्यांनी भूषविली.

१९८५ पासून विधानसभा सदस्य म्हणून आम्ही सोबत काम केले. जिल्ह्यामध्ये तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मधुकराव पिचड व आम्ही जिल्हा बँक आणि सर्व संस्थांमध्ये एकत्र काम केले. अकोले तालुक्यात धरण असूनसुद्धा संगमनेर आणि अकोले तालुका पाण्यापासून वंचित होता. या तालुक्यातील जनतेने पाणी उचलले तर त्यांना पाणी चोर म्हटले जायचे आणि म्हणून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मधुकरराव पिचड यांच्यासह मी १९८९ मध्ये भंडारदराच्या पाण्यासाठी मोठे आंदोलन केले आणि या संघर्षातून या दोन्ही तालुक्यांना ३० टक्के हक्काचे पाणी मिळाले. त्यानंतर येथील शेती फुलली.

सिंचनाचे अनेक प्रकल्प पिचड साहेबांनी तालुक्यात राबवले. यामध्ये प्रामुख्याने मुळा नदीवरील पिंपळगाव खांड तर आढळा नदीवरील सांगवी, पाडोशी ही धरणे होत. उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण अनेक दिवस रखडले होते. मात्र १९९९ नंतर पिचड साहेब आणि मी एकत्रित काम करत या कामाला गती दिली. आणि आधी पुनर्वसन मग धरण हा आदर्शवत प्रकल्प या धरणाच्या कामाच्या माध्यमातून राज्याला दिला. तेथील जनतेचे संगमनेर आणि अकोले तालुक्यामध्ये पुनर्वसन केले. या कामाच्या उभारणीमध्ये पिचड साहेबांचा मोठा वाटा राहिला. कालव्यांची कामे सुरू होती त्यावेळेस अनेक शेतकऱ्यांना समजावण्याचे काम त्यांनी केले आणि त्या माध्यमातूनच अकोले तालुक्यातून कालवे पूर्ण झाले.

पुरोगामी विचारसरणीच्या मधुकरराव पिचड साहेबांनी सर्वांना बरोबर घेऊन तालुक्याचा सर्वांगीण विकास घडवून आणला. अगस्ति सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. याचबरोबर अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी, आदिवासी उन्नती सेवा मंडळ या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून अकोले तालुक्यामध्ये शिक्षणाची पाळेमुळे भक्कम केली. आजही सहकाराबरोबर शिक्षण संस्था या अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. आणि याचे श्रेय हे मधुकरराव पिचड यांना जाते. हाच समाजकार्याचा वारसा माजी आमदार वैभवराव पिचड यांनीही सुरू ठेवला आहे.

प्रत्येकाची पक्ष जरी वेगळे असले तरी पक्षविरहित माणसे पिचड साहेब यांनी जपली. जिल्हा बँकेमध्ये सदैव आम्हाला साथ दिली. ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून त्यांनी सातत्याने काम केले आणि नव्या पिढीने त्यांचा कायम आदर केला. पाण्यासाठी झटणारा आणि लढणारा नेता अशी त्यांची मोठी ओळख होती. त्यांच्या निधनाने नव्या पिढीला मार्गदर्शन करणारा एक अनुभवी आणि ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला असून अकोले तालुक्याचा आधारवड ही त्यांची ओळख सदैव नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. आयुष्यभर सर्वसामान्यांसाठी झटणाऱ्या या लोकनेत्यास विनम्र अभिवादन!

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 609
बाळासाहेब थोरात मधुकरराव पिचड श्रद्धांजली
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एक फोन आणि सोयाबीनला ४ हजार रुपयांची मदत; दुष्काळात शेतकऱ्यांना जाणवू लागली अनुभवी नेतृत्वाची उणीव

07/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर न्यायालयाचा मोठा निकाल! वारकऱ्यांच्या दिंडीत कंटेनर घुसवणाऱ्या चालकाला दिली ‘ही’ शिक्षा

By Annant Ppangarkar07/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महामार्गावरून पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत निष्काळजीपणे कंटेनर घुसवून चार जणांना चिरडून…

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम; सव्वाशे पदकांसह उपविजेतेपदावर कोरले नाव

07/10/2026

तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एक फोन आणि सोयाबीनला ४ हजार रुपयांची मदत; दुष्काळात शेतकऱ्यांना जाणवू लागली अनुभवी नेतृत्वाची उणीव

07/10/2026

बुधवार, ०७ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल

07/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.