Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ जाण्यासाठी प्रत्येक कृतीत ईश्वरभाव जागवा: डॉ. संजय मालपाणी

25/08/2026

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘सत्तेची हवा’ जोरात; संगमनेरात गोदा-नर्मदा जलयात्रेत भाजप पदाधिकाऱ्यांची पोलिसांशी हुज्जत
महाराष्ट्र संवाद विशेष

‘सत्तेची हवा’ जोरात; संगमनेरात गोदा-नर्मदा जलयात्रेत भाजप पदाधिकाऱ्यांची पोलिसांशी हुज्जत

या पदाधिकाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांनी कडक भूमिका घेतली होती.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त आयोजित गोदा ते नर्मदा जलयात्रा शनिवारी रात्री संगमनेरमध्ये दाखल झाली असताना, एका दुर्दैवी प्रकाराने या जलयात्रेला गालबोट लागले आहे. भाजपच्या काही युवा पदाधिकाऱ्यांनी सत्तेच्या धुंदीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोरच महिला पोलीस कर्मचारी आणि बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांशी अरेरावी करत त्यांच्या कर्तव्यात अडथळा आणल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व राज्याचे जलसंपदा तथा अहिल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संपत्ती जलपूजा केल्यानंतर त्र्यंबकेश्वर येथून प्रारंभ झालेली ही जलयात्रा शनिवारी रात्री संगमनेरमधील प्रवरा नदीकाठच्या जाजू इंग्लिश मीडियम स्कूलच्या पटांगणात विसावली होती. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित या दिंडीच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती. सुरक्षिततेच्या कारणास्तव आणि शिस्त राखण्यासाठी पोलिसांनी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर कडक बंदोबस्त तैनात केला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार केवळ निमंत्रित आणि व्हीआयपी वाहनांनाच आत सोडले जात होते.

मात्र, याच दरम्यान पिवळ्या रंगाच्या वेस्पा स्कुटरवरून (क्रमांक MH-17-AT-1919) तीन युवक ट्रिपल सीट येत गेटमधून आत शिरण्याचा प्रयत्न करू लागले. कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदारांनी त्यांना अडवून दुचाकी बाहेर लावण्याची विनंती केली. मात्र, विनंती ऐकून घेण्याऐवजी दुचाकी चालक रोहित राजेश चौधरी आणि त्याच्यासोबत असलेला वरद प्रमोद बागुल यांनी पोलिसांशी उद्धट भाषेत वाद घालण्यास सुरुवात केली. तर तिसऱ्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही.

आपण युवा मोर्चाचे अध्यक्ष असल्याचे सांगत त्यांनी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर, पोलिसांनी वारंवार समजावून सांगूनही या युवकांनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करत गेटच्या विरुद्ध बाजूला अनधिकृतपणे वाहन पार्क करून आत प्रवेश केला.

विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे आणि पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या उपस्थितीत घडल्याने पोलिसांच्या शिस्तीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी संबंधित दुचाकी ताब्यात घेऊन तिची चावी जमा केली होती. परंतु, कार्यक्रम संपल्यानंतर हँडल लॉक नसलेली ही दुचाकी संबंधित युवकांनी तेथून लोटत नेल्याचा दावा करण्यात येत आहे, तर दुचाकीची चावी शहर पोलीस ठाण्यात जमा असल्याचे समजते. पोलीस याप्रकरणी कारवाई करण्याची शक्यता आहे.

या पदाधिकाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांनी कडक भूमिका घेतली होती. महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी केलेल्या गैरवर्तनामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आता या प्रकरणी पोलीस प्रशासन संबंधित पदाधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करणार की राजकीय दबावापोटी या प्रकरणावर पडदा टाकला जाणार, याकडे संपूर्ण संगमनेर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,118
गोदा ते नर्मदा जलयात्रा पोलीस कर्मचाऱ्यांसोबत वाद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी’ हे नैराश्यावरील प्रभावी औषध; संगमनेरमध्ये व्याख्यानमालेचा उत्साहात शुभारंभ

23/08/2026

शिक्षित वस्तीच्या मध्यभागी अंधश्रद्धेचा अघोरी खेळ: संगमनेरमधील घुलेवाडीत तांत्रिक प्रकारांमुळे खळबळ, सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

22/08/2026

कुंभेफळ परिसरात बिबट्याची दहशत: ३ वर्षीय चिमुकल्यावर हल्ला, नागरिकांच्या प्रसंगावधानाने बालकाचे प्राण वाचले

22/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

By Annant Ppangarkar25/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  विशेष प्रतिनिधी / मुंबई: मंत्रालयातील प्रशासकीय कामकाजाची शिस्त आणि…

‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ जाण्यासाठी प्रत्येक कृतीत ईश्वरभाव जागवा: डॉ. संजय मालपाणी

25/08/2026

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.