Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » डॉ. मैथिली तांबे ते लोकनेत्या मैथिलीताई तांबे
महाराष्ट्र संवाद विशेष

डॉ. मैथिली तांबे ते लोकनेत्या मैथिलीताई तांबे

वाढदिवस विशेष लेख
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

डॉ. मैथिली सत्यजीत तांबे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे संवेदनशीलता आणि शिस्त. यांचा संगम लाभलेले हे नेतृत्व संगमनेरच्या विकासाला नवी दिशा देत आहे.

चेन्नईच्या मातीत जन्म झाला असला तरी, सांगलीच्या खानापूर तालुक्यातील मातीची ओढ त्यांच्या रक्तात आहे. तामिळ, मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा भाषांच्या संगमातून त्यांना जे बहुभाषिक व्यक्तिमत्व लाभले त्यामुळेच त्यांना समाजाच्या विविध स्तरांतील लोकांशी संवाद साधणे सहज शक्य झाले. पण हा केवळ संवाद नव्हता तर ती नाती जोडण्याची एक कला होती.

डॉक्टर (BDS) म्हणून रुग्णांच्या वेदना समजून घेण्याचे कसब त्यांनी आत्मसात केले. मात्र, केवळ क्लिनिकपुरते मर्यादित न राहता, समाजातील मोठ्या व्यवस्थेत बदल घडवण्यासाठी त्यांनी शिक्षणाची कास धरली. ‘सिम्बायोसिस’ मधून MBA आणि ‘हार्वर्ड बिझनेस स्कूल’सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेतून नेतृत्व गुणांचे धडे गिरवले. पुण्यातील ‘TAS School’ मध्ये CEO म्हणून काम करताना त्यांनी राबवलेली ‘प्रणाली- आधारित कामकाज’ पद्धती ही त्यांच्या प्रगल्भ विचारांची साक्ष देते.

स्वातंत्र्यसैनिक स्व. भाऊसाहेब थोरात यांचा त्यागी वारसा, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांची संयमी वृत्ती आणि माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांची प्रशासकीय पकड अशा दिग्गज नेतृत्वांचे मार्गदर्शन मैथिलीताईंना लाभले. आमदार सत्यजीत तांबे यांच्यासोबतच्या सहजीवनातून त्यांना राजकारण हे सत्तेचे माध्यम नसून समाजसेवेचे साधन असल्याची प्रचिती आली.

‘I Love Sangamner’ आणि ‘जयहिंद लोकचळवळ’ या माध्यमातून त्यांनी महिलांचे बचत गट, युवकांचे कौशल्य आणि बालकांचे भविष्य घडवण्यासाठी जे काम केले, त्यातूनच खऱ्या अर्थाने त्या जनसामान्यांच्या “मैथिलीताई” झाल्या.

आज संगमनेरच्या नगराध्यक्षा म्हणून काम करताना त्यांच्यातली ‘डॉक्टर’ संवेदनशीलता जपते तर ‘मॅनेजर’ कामाची गती आणि अचूकता पाहते. त्यांचे स्वप्न केवळ रस्ते आणि इमारतींचे शहर उभारणे नाही तर एक ‘नागरिककेंद्रित आणि तंत्रज्ञानस्नेही’ संगमनेर घडवणे हे आहे. स्वच्छता, महिला सुरक्षा आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्या अहोरात्र झटत आहेत.

हा प्रवास पद किंवा प्रतिष्ठेचा नसून तो एका विश्वासाचा आहे जो संगमनेरच्या जनतेने माझ्यावर टाकला आहे, असे त्या जेव्हा म्हणतात तेव्हा त्यातील प्रामाणिकपणा काळजाला भिडतो.

आज वाढदिवसानिमित्त मैथिलीताईंना उदंड आयुष्य लाभो, हीच सदिच्छा! त्यांच्या रूपाने संगमनेरला लाभलेले हे सुशिक्षित आणि दूरदृष्टीचे नेतृत्व शहराला प्रगतीच्या शिखरावर नेईल, यात शंका नाही!

– समीर कडलग, संगमनेर.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 341
मैथिली तांबे समीर कडलग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने…

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.