Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक अहिल्यानगर जिल्ह्यात; शेती व पाणी परिस्थितीचा घेणार आढावा

08/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रविवार विशेष लेख… हाऊसवाईफ
महाराष्ट्र संवाद विशेष

रविवार विशेष लेख… हाऊसवाईफ

साभार समाज माध्यम
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/12/2024No Comments4 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रोज टीव्ही पाहून त्याला कंटाळा आला होता . तशी इतक्या दिवसांच्या सुट्टीची सवय नव्हती त्याला.. आज त्याने ठरवलं मौन व्रत करायचं.. कुणाशी बोलायचं नाही आणि काहीच करायच नाही.. घरात सगळ्यांना तस सांगूनही टाकल… त्याच्या बायकोला तसा आनंद झाला.. तसही चांगल बोलण ह्यांना माहीतच नाही.. निदान आज कंप्लेंट तरी ऐकायला मिळणार नाहीत असा मनात विचार करून ती मनोमन सुखावली.

आज तिने नास्ताला सकाळी डोसा केला मुद्दाम. ह्यांना डोसा आवडत नाही पण आज बोलणार नाहीत ठरवलं आहे, मग काय निदान रागाराग तरी करणार नाहीत. मुलांनी आवडीने डोसा खाल्ला त्यांची आवडती डिश. त्याने ही गुपचूप खायला सुरवात केली. खाताना त्याच्या लक्षात आले. किती छान डोसा बनवते ही. आपण न खाता उगीचच तिला बोल लावत होतो आणि त्यात मी खात नसल्याने माझ्यासाठी वेगळा नास्ता तिला बनवायला लागत असे. सगळ्यांचा नास्ता करून झाला. मग ती नास्ता करायला बसली. तो तिला पाहतच होता. खरंच आपल्याला गरमागरम डोसा दिला पण ती मात्र गार झालेल खात बसली. त्यानंतर ती आवरायला गेली.

तो हॉलमध्ये न्याहाळत बसला होता. दारावरच तोरण किती छान विणलं होत तिने. लगेच त्याच लक्ष वॉलवर गेलं, फ्रेम पाहिली किती छान पेन्टिंग केली होती. गेल्या वर्षीच आपल्या वाढदिवसाला तिने ती गिफ्ट केली होती. दुसऱ्या दिवशीच्या क्लायंट मीटिंग असल्याने आपण नीट पाहिलीही नव्हती आणि आभार मानायचे विसरून गेलो होतो. तस पाहता ती ऑलराऊंडर होती.

मी काय बरं तिला गिफ्ट दिल होत. अरे मी तर तिचा वाढदिवस विसरलो होतो. तरीही ती रागावली नव्हती. तिला वाईट वाटलंच असणार पण व्यक्त करायची हिम्मत झाली नसणार. हॉल किती छान सजवला होता तिने. स्वतः बनवलेल्या वस्तुंनी. तो खूप वेळ तसाच बसून होता. ती मात्र काम करतच होती. भांडी धुतली, केर काढला, फरशी पुसली, मुलांना अंघोळ घातली, कपडे धुतले, पुन्हा जेवण बनवायला लागली. ही काम करताना मुलं त्यांच्या परीने तिला मदत करत होते. आपण कधी तिला मदत केल्याच त्याला आठवेना. दुपारी जेवायला बसले मसाला भेंडी केली होती. हिच्या हातची मसाला भेंडी ऑफिसमध्ये सर्वाना फार आवडते. मसाला भेंडीची काय तर कुठला ही पदार्थ असो ती चांगलाच करते. जेवण झाले. सगळं आवरून ती मुलांचा अभ्यास घ्यायला बसली. मुलांचा अभ्यासही तीच घेत असे नेहमी. ऑफिसमधील काणेकर त्यांच्या मुलांची ट्युशनची फीस किती देतात आणि आपले किती पैसे वाचतात तो असाच बसून होता.

थोड्या वेळाने तिने शिलाई मशिन काढल आणि मुलीसाठी कपडे शिवायला घेतले. छोटीला छान गुलाबी फ्रॉक तिने शिवला होता. आता तर तिने काही नवीन बनवल तरी दाखवण बंद केल होत. कारण आपल उत्तर एकच होत तस तुला काम काय आहे. तू तर हाऊसवाईफच आहेस. घरात बसुनच असते. संध्याकाळ झाली तो गॅलरीमधे बसून होता. तिने चहा आणि कांदा भजी आणून दिली. अफलातून.. लागत होती.

त्याला लग्नानंतरचे दिवस आठवले. ती एका चांगल्या कंपनीमध्ये जॉबला होती. जेव्हा गुडन्यूज समजली तेव्हा तिने जॉब सोडला. मुलगी थोडी मोठी झाली मी पाळणाघरात ठेवायच सांगितलं पण तिने स्पष्ट नकार दिला. कारण तिला मुलांना वेळ, प्रेम, संस्कार द्यायचे होते आणि मला फक्त पैसा. गावी गेलो की माझे आई बाबाना किती हिचे कौतुक. किती गुणांची सून. पण मी मात्र हिने जॉब सोडल्यापासून सारख हाऊसवाईफ अस बोलत राहिलो. त्याला हे आठवून अपराध्यासारख झाल. रात्रीच जेवण झाल पण त्याच काही लक्ष नव्हत. बिछान्यात झोपायला गेला झोप काही लागत नव्हती. आजपर्यत मी किती चुकीच वागलो. बॉसचा राग मुलांवर किंवा हिच्यावर काढत राहिलो. घरी असायचो तरी फक्त प्रमोशनचा विचार करत असायचो. टार्गेट कंप्लीट करण्याच्या नादात मी मुलाना, बायकोला प्रेम द्यायच विसरून गेलो.

पैसा-पैसा आणि फक्त पैसा दिसत होता मला तर. माझ्या स्वभावाच्या उलट हिचा स्वभाव, हिने आयुष्यात नात्यांना महत्व दिल आणि मी पैसा आणि जॉबला. इतक सगळं घरासाठी करत असूनही मी हिच्याशी किती चुकीच वागलो. अपराध्याची भावना त्याच्या मनात आली. आता त्याने बदलायचा ठरवलं. सकाळी ती उठायच्या अगोदर तो उठला. केर काढला ती उठली तशी फ्रेश होऊन येणार इतक्यात तिच्या हातात चहाचा कप दिला. तिला आश्चर्याचा धक्का बसला तिने कप घेतला त्याच्या डोळ्यात अश्रू होते शब्द ही निघत नव्हते. तो फक्त म्हणाला… हाऊसक्वीन!

संकलन – प्रा. माधव सावळे

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 590
माधव सावळे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

By Annant Ppangarkar08/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून आणि आमदार अमोल खताळ…

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक अहिल्यानगर जिल्ह्यात; शेती व पाणी परिस्थितीचा घेणार आढावा

08/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.