Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तेव्हा देवेंद्र फडणवीसांचे ऐकले नाही… एकनाथ शिंदेंसोबत गेल्याचा पश्चाताप होतोय, जिल्ह्यातील लोकांसाठी थांबलोय नाहीतर आमदारकीचाही राजीनामा दिला असता; या आमदाराच्या वक्तव्यामुळे नव्या वादाची सुरुवात
राजकारण

तेव्हा देवेंद्र फडणवीसांचे ऐकले नाही… एकनाथ शिंदेंसोबत गेल्याचा पश्चाताप होतोय, जिल्ह्यातील लोकांसाठी थांबलोय नाहीतर आमदारकीचाही राजीनामा दिला असता; या आमदाराच्या वक्तव्यामुळे नव्या वादाची सुरुवात

पक्षात प्रामाणिकपणाला किंमत नाही
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार १६ डिसेंबर 

रविवारी संध्याकाळी महायुतीच्या सरकारमधील ३९ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. मंत्रीपद न मिळाल्याने नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पक्षांतर्गत नव्या वादाला तोंड फुटले आहे. सुरुवातीलाच मंत्रिपदावरून आमदारांमधील खदखद बाहेर आली आहे.

भोंडेकर म्हणाले, मला भाजपातील पक्षप्रवेशासाठी नक्कीच देवेंद्र फडणवीसांचा आग्रह होता. मलाही ते नेते म्हणून आवडतात. परंतु माझ्यावर पक्षांतराचा डाग लागू नये म्हणून मी जुन्या शिवसेनेत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र आता पश्चातापाची वेळ आल्यासारखे वाटतं. इथं शिवसेना काहीच नाही, आम्ही आमच्या ताकदीवर आहोत. एवढे मोठे पद असताना अशी परिस्थिती येते तेव्हा नक्कीच मनात तसं वाटतं.

मागच्या अडीच वर्षापूर्वी १० अपक्ष आमदारांमध्ये सगळ्यात आधी मी एकनाथ शिंदेंसोबत गेलो. कुठलाही स्वार्थ न ठेवता मी गेलो तेव्हा मला शब्द दिला होता. नक्कीच सरकार आपलं होणार आहे, तुम्हाला सन्मानाने मंत्रिपद देऊ परंतु मंत्रिपद दिले नाही. मात्र मंत्रिपद न मिळताही सोबत राहिलो, आमचा उद्देश सेना-भाजपा सरकार राहिले पाहिजे असा होता.

अडीच वर्षानंतर जेव्हा पक्षप्रवेशाची वेळ आली. तेव्हा चर्चा झाली, मागे मंत्रिपद नाही, महामंडळही दिले नाही परंतु आता नव्या सरकारमध्ये तुम्हाला मंत्री बनवू असं सांगितले. आमच्यात बोलणे झाले तेव्हाही शब्द दिला आणि जाहीरसभेतही बोलून दाखवले. एवढे झाल्यानंतर आज जे मागून आलेत, पक्षप्रवेश केलेत त्यांना मंत्रि‍पदे दिली. जे पक्षासोबत प्रामाणिक राहत नाही. इकडे तिकडे जातात त्यांना मंत्रिपद दिले मग मी पदावर राहून करू काय?

शिवसेनेत नेता, उपनेता हे मोठे पद असते. ६ जिल्ह्याचे समन्वयक पद आहे. परंतु कुठलीही चर्चा नाही. कुठलीही विचारपूस नाही. कुठलीही संधी नाही. मी जर न्याय देऊ शकत नाही त्यामुळे पदाचा राजीनामा दिला. भविष्यात अनेक गोष्टी आहेत ज्या माझ्या मनात आहेत त्या मी आज सांगू शकत नाही. मी शिवसैनिक म्हणून आहे आणि राहीन परंतु जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर मी फक्त माझ्या जिल्ह्यातील लोकांसाठी थांबलो आहे नाहीतर आमदारकीचाही राजीनामा दिला असता.

आमचा जिल्हा कधीपर्यंत बाहेरच्या उधार पालकमंत्र्यावर राहील, जिल्ह्याचा पालकमंत्री असता तर नक्कीच विकास झाला असता. आमच्या जिल्ह्याचा पुन्हा पालकमंत्री मिळणार नाही अशी खंत व्यक्त करत या सगळ्या गोष्टींवर भविष्यात परिस्थिती आल्यावर बोलेल, असा इशाराही आमदार भोंडेकरांनी दिला.

प्रामाणिकतेला किंमत नाही…

एकनाथ शिंदे यांना पाहून आम्ही पक्षात प्रवेश केला होता. शिंदेंनी विश्वासात घ्यायला पाहिजे होते. एवढे मोठे पक्षाचे उपनेते पद दिले पण त्याचा काही अर्थ आहे का? कुठेही विचारात न घेता मागून आलेल्या तुम्ही मंत्रिपद देता हे दु:ख वाटण्यासारखेच आहे. प्रामाणिकतेला काही अर्थ राहत नाही हे दिसून येते. प्रामाणिक कितीही राहा त्याला किंमत नसते, जे मागून येतात, थोडी हुल्लडबाजी करतात त्यांना न्याय मिळतो असं पाहायला मिळते अशी उघड नाराजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,236
एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस नरेंद्र भोंडेकर मंत्रिमंडळ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.