गुरुवार १९ डिसेंबर
संगमनेर – विधानसभा निवडणूक होऊन बराच काळ झाला आहे, तरीदेखील विरोधकांकडून सातत्याने ईव्हीएमच्या संदर्भात खोटा प्रचार सुरू असून खोट्या बातम्या, खोटे फोटो, व्हिडिओ असे प्रसारित केले जात आहे. अशा प्रकारे खोटे वृत्त प्रसारित करणाऱ्या विरोधात निवडणूक आयोगाने गुन्हे दाखल करण्याची मागणी संगमनेरच्या भारतीय जनता पक्षाने केली असल्याची माहिती दिनेश सोमाणी यांनी दिली आहे.

यांना दिले निवेदन – विरोधकांकडून केली जात असलेले कृती लोकशाहीच्या विरोधात असून या संदर्भातील मागणीचे निवेदन संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांना देण्यात आले आहे.
यासाठी केली मागणी – भारतीय कायद्यानुसार लोकांमध्ये गैरसमज पसरवणे, अफवा पसरवणे, संभ्रम पसरवणे गुन्हा आहे. हे माहिती असून सुद्धा जर असे नॅरेटिव्ह, अफवा पसरवल्या जात असतील तर ही एक गंभीर बाब आहे. देशात दर निवडणुकीच्या वेळेला नवीन मतदार, नवीन तरुण पिढी मतदार म्हणून मतदानाला येत असतात. त्यांच्यात जर अशा पद्धतीचा गैरसमज पसरविला गेला तर ते देशाच्या भविष्याच्या दृष्टीने धोकादायक असेल.

यांची होती उपस्थिती – यावेळी राम जाजू, राजेंद्र सांगळे, दिनेश सोमाणी, भारत गवळी, दिलीप रावळ, जगन्नाथ शिंदे, भरत ढोरे, सुशील शेवाळे, बाबाजी लोखंडे, निनाद भोर, कांचन ढोरे, ज्योती भोर, उषा कपिले, पायल ताजणे उपस्थित होते.


