Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अखेर खाते वाटपाला मुहूर्त लाभला… महत्त्वाची खाती फडणवीस, शिंदे आणि अजितदादांच्या हातात… बघा कोणाला कोणती खाती मिळाली, विखे पाटलांकडील महसूल काढले
राजकारण

अखेर खाते वाटपाला मुहूर्त लाभला… महत्त्वाची खाती फडणवीस, शिंदे आणि अजितदादांच्या हातात… बघा कोणाला कोणती खाती मिळाली, विखे पाटलांकडील महसूल काढले

अखेर उत्सुकता संपली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/12/2024Updated:21/12/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, २१ डिसेंबर 

नागपूर – राज्यात विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर तब्बल महिनाभराने मंत्रिमंडळाचे रखडलेले खातेवाटप शनिवारी जाहीर करण्यात आले. फडणवीस शिंदे पवार सरकारच्या मंत्रिमंडळातील खाते वाटपाला अखेर मुहूर्त लाभला असून राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडील महसूल खात्याच्या चाव्या दुसऱ्या मंत्र्यांकडे देण्यात आल्या आहे. विखेंकडील महत्त्वाचे खाते काढून आता त्यांच्याकडे जलसंधारण (गोदावरी व कृष्णा खोरे विकास) खात्याचा पदभार सोपविण्यात आला आहे. तर गृह खाते मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडेच ठेवले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास आणि गृहनिर्माण मंत्रालयाचे तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला होता. महायुतीच्या ३९ मंत्र्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली यात ३३ कॅबिनेट तर ६ राज्यमंत्र्यांचा समावेश होता. मात्र अधिवेशन संपले तरी देखील मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर होत नसल्याने महायुतीतील खात्यांवरून रंगलेल्या वादाची चर्चा सुरू होती. अखेर अधिवेशनाचे सुप वाजत असतानाच महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील एकमेव वजनदार मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल खाते कायम राहील ही आशा खातेवाटप जाहीर झाल्यानंतर फोल ठरली आहे. विखे यांच्याकडे महसूल खात्याची जबाबदारी काढल्याने त्यांचे पारंपारिक विरोधक बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तर विखे यांच्याकडे आता जलसंपदा खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

बघा खाते वाटपात कोणाला मिळाले कोणते खाते…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गृह, विधी व न्याय, ऊर्जा, इतर मंत्र्यांकडे नसलेले खाते

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – नगर विकास, गृहनिर्माण

उपमुख्यमंत्री अजित पवार – अर्थ

कॅबिनेट मंत्र्यांकडील खाते…

चंद्रशेखर बावनकुळे – महसूल

राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)

हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण

चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा

गणेश नाईक – वन

दादाजी भुसे – शालेय शिक्षण

संजय राठोड – माती व पाणी परीक्षण

धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन

उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा

जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल

पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन

अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नूतनीकरण

अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय

शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान

दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय

अदिती तटकरे – महिला व बालविकास

शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम

माणिकराव कोकाटे – कृषी

जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज

नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन

संजय सावकारे – वस्त्रोद्योग

संजय शिरसाट – सार्वजनिक न्याय

प्रताप सरनाईक – ट्रान्सपोर्ट

भरत गोगावले – रोजगार, फलोत्पादन

मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन

नितेश राणे – मत्स्य, बंदरे

आकाश फुंडकर – कामगार

बाबासाहेब पाटील – सहकार

प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य

राज्य मंत्र्यांकडील खाते…

माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण

आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय

मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा

इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन

योगेश कदम – ग्रामविकास, पंचायत राज

पंकज भोयर – गृहनिर्माण

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,775
खातेवाटप
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

By Annant Ppangarkar13/09/20260

प्रवीण पुरो – राज्यात आणि देशात होणाऱ्या सणासुदीच्या दिवसांमध्ये विघ्न आणणाऱ्या प्रवृत्तींना ठेचण्याचं काम ज्यांनी…

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.