सोमवार, २३ डिसेंबर
नाशिक – राज्याचे नवे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची अहिल्यानगर जिल्हा ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन (सर्वांसाठी मानवाधिकार) या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये भेट घेत त्यांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या.
संघटनेच्या माध्यमातून राज्यभर मानवी मूल्यांचे जतन व्हावे व सर्वांना न्याय मिळावा या भावनेने काम केले जात असताना मानवाधिकार संघटनेच्या या कामकाजामध्ये झिरवाळ यांचे पदाधिकाऱ्यांना नेहमी सहकार्य मिळत असते.
नासिक येथील समाजसेवक व संस्थापक अध्यक्ष वसीम सय्यद (गुड्डू भाई) यांच्यामार्फत या संस्थेचे काम सुरू आहे. संघटनेच्या कामकाजासाठी सातत्याने मंत्रालय किंवा शासकीय विभागामध्ये सर्वसामान्य माणसांना न्याय हक्कासाठी लढा द्यावा लागतो. समाजातील सर्व शहरातील गोरगरीब व पिळवणूक झालेल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी ह्यूमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन ही संघटना सातत्याने काम करते. या संघटनेसाठी अनेकांचे सहकार्य लाभत असते, त्यात नरहरी झिरवाळ यांचा समावेश आहे. त्यांची राज्याच्या मंत्रिमंडळात अन्न व औषध प्रशासन मंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे.
त्यामुळे झिरवाळ यांचा अहिल्यानगर जिल्हा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष बानोबी शेख, संगमनेर तालुकाध्यक्ष आरती सोनवणे, अहिल्या नगर जिल्हाध्यक्ष शौकत पठाण, जमीर शेख, सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी मावळा पंकज पडवळ यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
झिरवाळ संगमनेरला येणार…
या भेटीत मंत्री झिरवाळ यांना संगमनेरला येण्याचे निमंत्रण देण्यात आले. मंत्री झिरवाळ यांनी देखील संगमनेरला येण्याचे मान्य केले असून येत्या काही दिवसात ते संगमनेरला येण्याची शक्यता आहे. झिरवाळ यांच्या निवडीचा संघटनेच्या कार्यकर्त्यांना आनंद झाल्याचे सांगण्यात आले.


