Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » यंदाचे शांती फाउंडेशनचे पुरस्कार ‘यांना’ जाहीर, ५ जानेवारीला होणार सन्मान!
सामाजिक

यंदाचे शांती फाउंडेशनचे पुरस्कार ‘यांना’ जाहीर, ५ जानेवारीला होणार सन्मान!

डॉ. राजेश आहेर, रघुवीर खेडकर व संदीप वाकचौरे यांचा समावेश
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार २४ डिसेंबर

संगमनेर – येथील शांती फाउंडेशनच्यावतीने दरवर्षी दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्ष व माजी नगराध्यक्षा दूर्गाताई तांबे यांनी पुरस्कार विजेत्यांच्या नावाची घोषणा केली. ५ जानेवारीला संगमनेरमध्ये विविध मान्यवरांचे उपस्थितीत पुरस्कारार्थींचा सन्मान केला जाणार आहेत.

नाट्य क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल आणि मराठी, हिंदी विविध दूरचित्र वाहिन्यांवरील मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे उलटा चष्मा फेम डॉ. राजेश आहेर यांना नाट्य क्षेत्रासाठीचा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.

तमाशा क्षेत्रात योगदान देऊन ग्रामीण व शहरी जनतेचे मनोरंजन करतानाच प्रबोधनाची परंपरा चालवणारे जेष्ठ कलावंत आणि महाराष्ट्र राज्य लोकनाट्य मंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांना कांताबाई सातारकर लोक नाट्य कलाभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

शिक्षण, साहित्य, पत्रकारीता क्षेत्रासाठीचा सावित्रीबाई फुले पुरस्कार शिक्षण अभ्यासक संदीप वाकचौरे यांना घोषित करण्यात आला आहे. वाकचौरे यांनी १५ पेक्षा अधिक पुस्तकाची लेखन केले आहेत. महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रासाठी स्तंभलेखन करत आहे. राज्य शासनाच्या विविध समित्यांवरती ते कार्यरत आहेत. त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

यावेळी डॉ.सोमनाथ मुटकुळे लिखित दहा नाट्य पुस्तकांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. नाट्यसृष्टीत लेखन, अभिनय, दिग्दर्शनात राज्यस्तरावरील विविध पारितोषिक प्राप्त ही नाटके असणार आहेत.

पुरस्काराचे वितरण व पुस्तक प्रकाशन ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत संजय सोनवणी यांच्या हस्ते करण्यात येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे असतील. प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चपराक प्रकाशनाचे प्रमुख ज्येष्ठ संपादक घनश्याम पाटील, दुर्गाताई तांबे उपस्थित राहणार आहेत.

पुरस्कार निवड समिती सदस्य म्हणून डॉ. सोमनाथ मुटकुळे, सूर्यकांत शिंदे, माधवी देशमुख यांनी काम पाहिले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 735
पुरस्कार रघुवीर खेडकर शांती फाउंडेशन संदीप वाकचौरे सोमनाथ मुटकुळे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

By Annant Ppangarkar09/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने एमडी ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात…

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.