Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्यात कायद्याचं राज्य नाही – वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
राजकारण

राज्यात कायद्याचं राज्य नाही – वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

राज्यात महिला आणि मुली निर्भयपणे फिरू शकत नाही. इथे गुंड, बलात्कारी निर्धास्तपणे फिरत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार २६ डिसेंबर 

विशेष प्रतिनिधी / मुंबई

गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील हत्यासत्र ज्या गतीने सुरु आहे ते पाहता राज्यात कायद्याचं राज्य राहिलं नसल्याचं काँग्रेसचे आमदार आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. सध्या राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या हत्या सत्रांमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अशामध्ये काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून जाग येण्यासाठी आणखी किती वाट पाहणार आहात? असा सवाल त्यांनी यावेळी राज्य सरकारला केला आहे.

कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. पुण्यामध्येही दोन बहिणींची हत्या करण्यात आली. तर, पुणे शहरात भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. यामुळे विरोधकांकडून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावरून काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी “बदलापूर…आता कल्याण, पुणे! जाग येण्यासाठी सरकार आणखी किती घटनांची वाट बघत आहे, असं विचारलं आहे.

कल्याण येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपी विशाल गवळीवर यापूर्वीही अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असताना तो जामिनावर सुटला आणि पुन्हा एका लहान मुलीवर अत्याचार करून तिचा जीव घेतला. हे अत्यंत संतापजनक आहे. राज्यातील पोलीस आणि कायदा यांचा गुन्हेगारांवर धाक उरला नसल्याचे स्पष्ट होते, असा थेट आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

बदलापूर असो किंवा कल्याण, महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर महायुती सरकार किती गंभीर आहे? हे या घटनांमधून स्पष्ट होते. राजगुरुनगर, पुणे येथे दोन बहिणींची हत्या हादेखील संतापजनक प्रकार आहे. खेळता खेळता हरवलेल्या या मुलींच्या निर्घृण हत्येमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे स्पष्ट होत आहे. गुन्हेगार निर्भयपणे वावरत असून हे सरकारच्या अपयशाचे लक्षण आहे, या दोन्ही घटनांमधील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी.

राज्यात महिला आणि मुली निर्भयपणे फिरू शकत नाही. इथे गुंड, बलात्कारी निर्धास्तपणे फिरत आहेत. राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून महायुती सरकारला जबाबदारी स्वीकारावी लागेल. या दोन्ही घटनांतील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलीस आणि न्यायव्यवस्थेने ठोस पावले उचलावी, अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 474
विजय वडेट्टीवार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  (विशेष प्रतिनिधी): संगमनेर शहरातील खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका…

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.