Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

आज, शनिवार २५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 25, 2026

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीत भाजप सात राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलणार तर फेब्रुवारीपर्यंत पक्षाला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष
राजकारण

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीत भाजप सात राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलणार तर फेब्रुवारीपर्यंत पक्षाला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय त्यांच्याकडे महसूलसारखे महत्त्वाचे खाते सोपविण्यात आले असल्याने प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांचे नाव चर्चेत आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 30, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार ३० डिसेंबर

नवी दिल्ली : राज्यात विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर मोठ्या बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपमध्ये लवकरच संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल होणार असून, महाराष्ट्रासह सात राज्यांचे भाजप अध्यक्ष बदलण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पक्षाला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.

या राज्यात बदल – मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर आणि झारखंडमधील प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार आहेत. मात्र, भाजपच्या घटनेनुसार या फेरबदलांपूर्वी पक्षाला ५० टक्के राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका पूर्ण कराव्या लागणार आहेत.

राज्यात विद्यमान प्रदेशाध्यक्ष मंत्री – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय त्यांच्याकडे महसूलसारखे महत्त्वाचे खाते सोपविण्यात आले असल्याने प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांचे नाव चर्चेत आहे.

दिल्लीत झाली बैठक – संघटनात्मक निवडणुकांबाबत रविवारी दिल्लीत भाजपची बैठक झाली, त्यात या निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली. पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा, संघटनेचे सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्याशिवाय सर्व राष्ट्रीय सरचिटणीस, राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, संघटना मंत्री, संघटना निवडणूक प्रभारी व सहप्रभारी या बैठकीला उपस्थित होते.

निवडणुकांमुळे नड्डा यांचा कार्यकाळ वाढवला – जे. पी. नड्डा यांना जून २०१९ मध्ये पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आणि जानेवारी २०२० मध्ये पूर्णवेळ अध्यक्ष बनवण्यात आले. पक्षाध्यक्षाचा कार्यकाळ ३ वर्षांचा असतो. त्यामुळे नड्डा यांचा कार्यकाळ २०२३ मध्येच संपला आहे. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता. भाजपच्या घटनेनुसार एखादी व्यक्ती जास्तीत जास्त दोन टर्म लागोपाठ अध्यक्ष राहू शकते. मात्र, नड्डा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर त्यांची पुन्हा अध्यक्ष होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. भाजपच्या ‘एक व्यक्ती-एक पद’ या नियमामुळे नड्डा सध्या अध्यक्ष होऊ शकत नाही.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 509
प्रदेशाध्यक्ष बदल भाजप
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

By अनंत पांगारकरJuly 25, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, आळेफाटा: हातात प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या आणि पोती धरून कचरा गोळा करण्याचा…

आज, शनिवार २५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 25, 2026

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.