Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पहिलाच चेंडू टोलवत आमदार सत्यजित तांबे व माजी आमदार डॉ. सुधीर तांबेनी केला राज्य पातळीवरील सहकार महर्षी टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ, १७ दिवस चालणार स्पर्धा
क्रिडा व कला

पहिलाच चेंडू टोलवत आमदार सत्यजित तांबे व माजी आमदार डॉ. सुधीर तांबेनी केला राज्य पातळीवरील सहकार महर्षी टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ, १७ दिवस चालणार स्पर्धा

राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये तरुणांना करिअर संधी उपलब्ध करून दिला जात याचाच एक भाग म्हणून जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून संगमनेरमध्ये गेल्या २५ वर्षांपासून राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/01/2025Updated:01/01/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, दि. ०१ जानेवारी २०२५

संगमनेर – गेल्या पंचवीस वर्षांपासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय सहकार महर्षी क्रिकेट चषकासाठी स्पर्धांना सुरुवात झाली आहे. सतरा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत अनेक राज्यस्तरीय खेळाडूंचा सहभाग राहणार असल्याने ही क्रिकेट स्पर्धा क्रीडा रसिकांसाठी मोठी मेजवानी ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे.

राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये तरुणांना करिअर संधी उपलब्ध करून दिला जात याचाच एक भाग म्हणून जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून संगमनेरमध्ये गेल्या २५ वर्षांपासून राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते.

नासिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार व क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सत्यजित तांबे आणि माजी आमदार, जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुधीर तांबे, उद्योजक गिरीश मालपाणी यांनी चेंडू टोलवत या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ केला. राज्यभरातून या स्पर्धेत क्रिकेट संघांनी सहभाग घेतला आहे. क्रीडा स्पर्धेच्या शुभारंभाचे सूत्रसंचालन संदीप लोहे यांनी केले तर अंबादास आडेप यांनी आभार मानले पहिल्याच दिवशी पहिल्या सत्रामध्ये एसएमबीटी कॉलेज नंदीहिल विरुद्ध जिजामाता अकॅडमी यांच्यामध्ये सामना खेळविला गेला.

अजिंक्य रहाणे सह राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेटपटूंचा सहभाग राहणार…

सहकार महर्षी T-20 क्रिकेट स्पर्धेचे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलामध्ये उत्कृष्टरित्या आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण मैदानावर आंतरराष्ट्रीय सामन्याप्रमाणे लॉन तयार करण्यात आली असून टर्फ विकेट बनविण्यात आली आहे. व्हीआयपी बैठक व्यवस्थेसह सुमारे दहा हजार नागरिकांसाठी प्रेक्षक गॅलरी, संगीत वाद्य, आकर्षक सजावट, ऑनलाइन प्रक्षेपण, महिला पुरुषांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था अशा परिपूर्ण तयारी मुळे स्पर्धा आकर्षणाच्या केंद्र ठरणार असून या स्पर्धेत संगमनेर भूषण अजिंक्य रहाणे याच्यासह राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. 

आमदार सत्यजित तांबे म्हणाले, संगमनेरमध्ये सुसज्ज क्रीडा संकुल व्हावे, ही भाऊसाहेब थोरात यांची इच्छा होती. याकरिता त्यांनी शेतकी संघाची एक एकर जागा व उर्वरित जागा गोखले एज्युकेशन शिक्षण संस्थेकडून घेऊन ती क्रीडा संकुलाला दिली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये अद्यावत असे हे क्रीडा संकुल उभारले गेले आहे. येथे खेळाच्या सुविधा निर्माण केल्या गेल्या. राज्यभरात कोठे नाही अशी व्यवस्था येथे तयार करण्यात आली आहे. मागील २५ वर्षापासून जयहिंदच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धा होत असून अत्यंत चांगल्या नियोजनामुळे आयपीएल आणि रणजीमधील अनेक खेळाडू या ठिकाणी सहभागी होत असतात.

माजी आमदार तांबे म्हणाले, क्रिकेटसारख्या खेळामधून सांघिक भावना वाढीस लागत असून जय-पराजय यापेक्षा तरुणांमध्ये यामुळे खेळाडू वृत्ती निर्माण होते. अजिंक्य रहाणे याच्यासह अनेक खेळाडूंनी संगमनेरचे नाव क्रिकेटमधून देश पातळीवर तसेच देशाबाहेर नेले आहे. या पुढील काळातही युवकांनी विविध खेळांमधून संगमनेरचे नाव देश व राज्य पातळीवर न्यावे.

उद्योजक गिरीश मालपाणी म्हणाले, संगमनेरमध्ये सुरू असलेल्या या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंसह प्रेक्षकांसाठी अत्यंत चांगल्या सुविधा निर्माण केल्या गेल्या आहे. या क्रीडा स्पर्धेतील सामन्यांचा थरार हा रोमांचकारी ठरत असतो.

यांची होती उपस्थिती –  यावेळी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, उद्योजक ओंकार सोमानी, सुधाकर जोशी, के. के. थोरात, रामहरी कातोरे, वैभव शहा, कल्पेश मेहता, राजेंद्र काजळे, राहुल गडगे, विश्वास मूर्तडक, नितीन हासे, गणेश मादास, संकेत शहा, ॲड. सुहास आहेर, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी, शैलेश कलंत्री, आसिफ तांबोळी, मनीष माळवे, संदीप लोहे, अंबादास आडेप, गिरीश गोरे, हैदरअली सय्यद, एकनाथ श्रीपाद, प्रशांत गुंजाळ, हर्षवर्धन सातपुते, जयेश जोशी, कमलेश सोनवणे, खलील पिरजादे, महेंद्र भालारे, मनीष काकडे, मयूर जाधव, मोंटू ओझा, नामदेव मुटकुळे, प्रवीण गुंजाळ, रमेश नेहे, रवी शिंदे, रोशन आमले, सचिन भालेकर, सौरभ उमरजी, श्रेयस करपे, शुभम परदेशी, सुमित काळंगे, स्वप्निल खोजे, अनिल शेळके, हर्षल राहणे, सुमित पानसरे, सागर कानकाटे यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,533
क्रिकेट स्पर्धा जयहिंद लोक चळवळ सत्यजित तांबे सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी…

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.