Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिवरायांचा अपमान करणाऱ्या ‘विकृत’ प्रवृत्तींना वेळीच रोखा; डॉ. सुधीर तांबे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांचा कडाडून हल्ला
सामाजिक

शिवरायांचा अपमान करणाऱ्या ‘विकृत’ प्रवृत्तींना वेळीच रोखा; डॉ. सुधीर तांबे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांचा कडाडून हल्ला

नेहरू गार्डन येथे सामूहिक वाचन झाल्यानंतर हजारो नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत भव्य रॅली काढली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येथे महाराजांना अभिवादन करण्यात आले याचबरोबर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनाही अभिवादन करण्यात आले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/04/2026Updated:26/04/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या सत्ताधारी आमदाराचा माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शिरलेली ही ‘गुंडगिरी’ आणि ‘असंस्कृतपणा’ राज्याच्या प्रतिमेला काळिमा फासणारा असून, अशा प्रवृत्तींना वेळीच रोखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून रविवारी संगमनेरच्या नेहरू गार्डनमध्ये ‘शिवाजी कोण होता’ या गोविंद पानसरे लिखित पुस्तकाचे सामुदायिक वाचन करण्यात आले. या पुस्तकाबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी तांबे व थोरात बोलत होत्या.

माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले की, संबंधित आमदाराने केलेल्या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्राने एकजुटीने निषेध केला पाहिजे. अशा असभ्य आणि गुंड प्रवृत्तीचे लोक विधिमंडळासारख्या पवित्र सभागृहात पोहोचतातच कसे, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. उपमुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून संबंधित आमदाराचा तातडीने राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली. बहुजन समाजात बुद्धिमान लोक नाहीत, असा चुकीचा संदेश देण्यासाठी काही विशिष्ट प्रवृत्ती जाणीवपूर्वक इतिहास बदलण्याचे षडयंत्र रचत असून या विरोधात त्यांनी सर्वसामान्य जनतेला आता जागरूक होण्याचे आवाहन केले आहे.

दुसरीकडे, डॉ. जयश्रीताई थोरात यांनी देखील सत्ताधाऱ्यांच्या मानसिकतेवर जोरदार प्रहार केला. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे आराध्य दैवत असल्याचे सांगत त्यांनी महाराजांच्या महानतेवर प्रकाश टाकला. महाराजांना जर आणखी दहा वर्षांचे आयुष्य लाभले असते, तर त्यांनी संपूर्ण जगावर राज्य केले असते, इतकी ताकद त्यांच्या विचारात होती, असे त्या म्हणाल्या. महाराजांनी दिलेला महिलांचा सन्मान आणि समानतेचा विचार आज पायदळी तुडवला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

ज्यांनी शिवरायांचे विचार कधी आत्मसात केले नाहीत, तेच लोक आज काहीही बरळत असून महाराष्ट्राची संस्कृती खराब करण्याचे काम करत आहेत. अशा विकृत प्रवृत्तीला समाजात अजिबात थारा देऊ नका, असे आवाहन करत महाराजांचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे डॉ. थोरात यांनी ठामपणे मांडले.

यावेळी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, छात्रभारतीचे अनिकेत घुले, प्रा. बाबा खरात, विलास कवडे, सोमेश्वर दिवटे, राम अरगडे, राजा आवसक, ॲड. समीर लामखेडे, ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी, गजेंद्र अभंग, विनोद राऊत, विजय पवार, प्रमिला अभंग, अमोल शेलकर, मोहसीन शेख, अशोक सातपुते, विजय सातपुते, रोहिणी गुंजाळ, विजय उदावंत, प्रकाश कडलग यांच्यासह पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, दलित पॅंथर, अनिस, छात्रभारती, आरपीआय, विद्यार्थी सेना, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सत्यशोधक विचार मंच, समता विचार मंच यांसह विविध पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विचारांसाठी संगमनेरकर रस्त्यावर एकवटले- लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा सुसंस्कृत विचारांचा तालुका म्हणून ओळखला जातो. समतेचा आणि प्रगतीचा विचार घेऊन या तालुक्याने कायम राज्याला दिशा दिली आहे. नेहरू गार्डन येथे सामूहिक वाचन झाल्यानंतर हजारो नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत भव्य रॅली काढली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येथे महाराजांना अभिवादन करण्यात आले याचबरोबर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनाही अभिवादन करण्यात आले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 473
जयश्री थोरात शिवाजी कोण होता संजय गायकवाड सामूहिक पुस्तक वाचन सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar19/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आणि उत्साहवर्धक राहील. कार्यक्षेत्रात नवीन संधी…

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.