Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

धुळ्यात ४० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर आणि पोलीस शिपाई रंगेहात जाळ्यात; तळेकर काही काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्यात होते कार्यरत

August 4, 2026

रोटरी क्लबच्या निवडी जाहीर, यांचा झाला पदग्रहण समारंभ

August 4, 2026

सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं

August 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिवरायांचे विचार आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी; आमदार सत्यजीत तांबे यांनी मांडले परखड विचार
राजकारण

शिवरायांचे विचार आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी; आमदार सत्यजीत तांबे यांनी मांडले परखड विचार

अशा प्रकारच्या भाषेमुळे आणि वर्तनामुळे 'लोकप्रतिनिधी कसा नसावा' यावरही समाजात चर्चा सुरू झाली असून, स्त्रियांचा अनादर करणाऱ्यांना महाराज कधीच माफ करणार नाहीत, असे तांबे यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 26, 2026Updated:April 26, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची आजच्या काळात असलेली सुसंगतता आणि लोकप्रतिनिधींचे सार्वजनिक वर्तन या विषयावर आमदार सत्यजीत तांबे यांनी समाजमाध्यमाद्वारे आपले परखड मत व्यक्त केले आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या विविध चर्चांच्या पार्श्वभूमीवर, शिवाजी महाराज नेमके कोण होते आणि त्यांचे स्वराज्य कोणत्या मूल्यांवर उभे होते, यावर नवीन पिढीमध्ये मंथन होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

आमदार तांबे यांनी आपल्या पोस्टमध्ये प्रामुख्याने कॉ. गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचा संदर्भ देत, ३९ वर्षांनंतरही या पुस्तकाचे महत्त्व अबाधित असल्याचे सांगितले. शाळेत शिकवले जाणारे महाराज आणि प्रत्यक्ष इतिहासातील महाराज यांच्यातील तफावतीबद्दल त्यांच्या कन्या अहिल्या हिने उपस्थित केलेल्या प्रश्नाचा उल्लेख करत, तांबे यांनी आजच्या पिढीपर्यंत महाराजांची खरी आणि सर्वसमावेशक ओळख पोहोचवण्यावर भर दिला आहे.

यावेळी त्यांनी २०१५ मधील एका घटनेची आठवण करून दिली, जेव्हा कॉ. गोविंद पानसरे यांच्या निधनानंतर अहमदनगर शहरात प्रबोधनासाठी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या १०,००० प्रतींचे वाटप करण्यात आले होते. महाराजांनी बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींना सोबत घेऊन उभारलेले स्वराज्य हे खऱ्या अर्थाने लोकशाहीवादी विचारांचे प्रतीक होते. राजाने रयतेचा छळ करण्याऐवजी रयतेला केंद्रबिंदू मानून राज्यकारभार करावा, हीच छत्रपतींची शिकवण आजच्या महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाया असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही चर्चा केवळ वादासाठी मर्यादित न राहता, ती अभ्यासाच्या आणि पुढील पिढीला योग्य दिशा देण्याच्या उद्देशाने व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आमदार तांबे यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी आमदार संजय गायकवाड यांच्या व्हायरल झालेल्या संभाषणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘परस्त्रीला आई मानण्याचा’ आणि शत्रूपक्षातील स्त्रियांचाही आदर राखण्याचा जो पवित्र दंडक घालून दिला होता, त्याचे उल्लंघन करणाऱ्या शब्दांचा वापर करणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अशा प्रकारच्या भाषेमुळे आणि वर्तनामुळे ‘लोकप्रतिनिधी कसा नसावा’ यावरही समाजात चर्चा सुरू झाली असून, स्त्रियांचा अनादर करणाऱ्यांना महाराज कधीच माफ करणार नाहीत, असे तांबे यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.

रयतेच्या स्वराज्यातील नैतिक मूल्यांची जपणूक करणे ही प्रत्येक जबाबदार नागरिकाची आणि विशेषतः लोकप्रतिनिधींची कर्तव्य असल्याचे त्यांनी या निमित्ताने अधोरेखित केले आहे.

आमदार तांबे यांनी नेमके काय म्हटले आहे वाचा खालील लिंक मध्ये…

https://www.facebook.com/share/p/1F8xEjgttU/

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 219
छत्रपती शिवाजी महाराज संजय गायकवाड सत्यजित तांबे समाज माध्यम
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये कथित पाकिस्तानी ‘ग्लोरी’ क्रीम विक्रीप्रकरणी शिवसेना आक्रमक; तपासात दिरंगाई झाल्यास करणार ‘असे काही’!

August 4, 2026

नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या आवाहनाला युवकांचा वाढता प्रतिसाद, फ्रेंडशिप डेच्या संदेशातून ९ ऑगस्टच्या चक्काजाम आंदोलनाचे आवाहन

August 2, 2026

नाशिक-पुणे रेल्वेसाठी ९ ऑगस्टला महामार्गावर चक्काजाम; आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून जनआंदोलनाची हाक

July 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

धुळ्यात ४० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर आणि पोलीस शिपाई रंगेहात जाळ्यात; तळेकर काही काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्यात होते कार्यरत

By अनंत पांगारकरAugust 4, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  धुळे: पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर यांच्यावर धुळे…

रोटरी क्लबच्या निवडी जाहीर, यांचा झाला पदग्रहण समारंभ

August 4, 2026

सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं

August 4, 2026

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले…

August 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.