Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पोलीस उपअधीक्षकांची भेट घेत भाजप पदाधिकाऱ्यांनी वेधले समस्यांकडे लक्ष
सामाजिक

पोलीस उपअधीक्षकांची भेट घेत भाजप पदाधिकाऱ्यांनी वेधले समस्यांकडे लक्ष

पोलीस उपअधीक्षकांनी या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/01/2025Updated:01/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, ०१ डिसेंबर २०२५
संगमनेर – पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे यांची भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी भेट देत शहरातील विविध समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. भाजपाच्या या मागण्याप्रश्नी पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. कायदा व सुव्यवस्था, चोऱ्या, पोलीस नावाचा बेकायदेशीर वापर, रिक्षा थांबे, अनावश्यक बॅरिकेटिंग आदी प्रश्नांचा यात समावेश आहे.
शहरातील व्यावसायिक कासट बंधूंना झालेली मारहाण यामुळे संगमनेर मध्ये कायदा व सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात पोलीस तपासाबाबत पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपअधीक्षकांशी चर्चा केली. तात्काळ गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
शहर आणि तालुक्याच्या अनेक भागात खाजगी वाहनांवर ‘पोलीस’ असा फलक लावून वाहने फिरत असतात. गाडीच्या दर्शनी भागात कोणालाही दिसेल अशा पद्धतीने पोलीस कॅप ठेवलेली असते. अशी वाहने रस्त्यात वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने कोठेही उभी केलेली असतात. या वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे देखील पालन होत नाही. पोलिसांच्या अधिकृत वाहनाशिवाय खाजगी वाहनावर अशा प्रकारे पोलीस नावाच्या पाट्या लावणे बेकायदेशीर आहे. अशा पाट्या लावून गुन्हेगारी वृत्तीचे लोक गुन्हे करू शकतात.
अशा वाहनचालकांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून सामान्य नागरिकांना धमकावण्याचे प्रकार देखील होतात. अशा बेकायदेशीर पोलीस नावाचा वापर करणाऱ्या वाहन चालक-मालकांवर कारवाई करण्यात यावी.
संगमनेर परिसरात तसेच बस स्थानकावर गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरी, दागिने चोरीच्या प्रकारात वाढ झाली आहे. यासंदर्भात पोलीस प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करून दागिने चोरांचा शोध घेत चोऱ्यांना आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
बस स्थानकाजवळ काश्मीर हॉटेल समोरील रस्ता बॅरिकेट लावून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अकोले कडून येणाऱ्या वाहनचालकांना शासकीय विश्रामगृहाजवळून वाहने वळविण्याची कसरत करावी लागते. यामुळे तेथे देखील वाहतुकीची कोंडी निर्माण होत असून पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी बॅरिकेट टाकण्याचा उद्देश सफल झाल्याचे दिसत नाही. पोलीस प्रशासनाने बॅरिकेट टाकण्याऐवजी येथे असलेला रिक्षा थांबा हटवावा आणि या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्यात यावी. शिवाय येथील सिग्नल यंत्रणा सुरू केल्यास या परिसरात वाहतुकीला शिस्त लागू शकते.
संध्याकाळी अंधार पडल्यानंतर जाणता राजा मैदान परिसरात दारुड्यांचे साम्राज्य असते. त्यांच्या वागणुकीचा परिसरातील नागरिकांना त्रास होत असून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांमध्ये देखील दारुड्यांच्या उपद्रवामुळे भीतीचे वातावरण असते. येथे सायंकाळ नंतर पोलिसांची गस्त सुरू केल्यास या दारुड्यांचा बंदोबस्त होऊ शकतो, असे देखील निवेदनात म्हटले आहे. तरी पोलीस उपअधीक्षकांनी या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये राम जाजू, राजेंद्र सांगळे, दिनेश सोमानी, दिलीप रावळ, भरत ढोरे, कल्पेश पोगुल, जगन्नाथ शिंदे, भगवान कुक्कर, सुशील शेवाळे, पांडुरंग शेरॉल, कांचन ढोरे, ज्योती भोर, रेश्मा खांडरे, पायल ताजणे, अरुणा पवार आदींचा समावेश होता.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,457
कुणाल सोनवणे निवेदन राजेंद्र सांगळे संगमनेर भाजप समस्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीमुळे देशात आदर्श मॉडेल ठरलेल्या…

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.