Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » डॉ. मनमोहन सिंग यांच्यामुळेच देशाची अर्थव्यवस्था मजबूत – माजी मंत्री थोरात
श्रद्धांजली

डॉ. मनमोहन सिंग यांच्यामुळेच देशाची अर्थव्यवस्था मजबूत – माजी मंत्री थोरात

मी कृषिमंत्री असताना व विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना २००८ मध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी ७० हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केल्याचे आठवण सांगत शेतकऱ्यांशी अत्यंत तळमळीने संवाद साधणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचा साधेपणा, स्वच्छ चरित्र, निगर्वीपणा हा देशवासीयांच्या कायम स्मरणात राहणारा असल्याचे थोरात म्हणाले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/01/2025Updated:02/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मनमोहन सिंग यांना शोकसभेतून अभिवादन
स्वच्छ चारित्र्य असलेल्या मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण – डॉ. तांबे
गुरुवार, ०२ जानेवारी
संगमनेर – खुल्या अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत केला असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.
मालपाणी लॉन्स येथे भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित शोकसभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माधवराव कानवडे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, रिपाई नेते बाळासाहेब गायकवाड, रणजीतसिंह देशमुख, युवक काँग्रेस अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, हिरालाल पगडाल आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गोरगरीब माणसाला केंद्रबिंदू मानून यूपीए सरकारच्या काळात अन्नसुरक्षा कायदा, आरोग्याच्या विविध योजना, माहितीचा अधिकार, शिक्षणाचा मूलभूत अधिकार, महिला व बालकांसाठी आरोग्य सुविधा असे अनेक कल्याणकारी निर्णय घेतले. डॉ. सिंग कल्याणकारी धोरण राबविणारे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ होते. त्यांनी देशाच्या आर्थिक क्षेत्रात दिलेले योगदान अत्यंत मोलाचे असून त्यांच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे स्वरूप बदलण्यास मोठी मदत झाली.
देशाचा अर्थमंत्री म्हणून कारभार पाहताना खुल्या अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारले. लायसन्स राज संपवून त्यांनी उद्योग व्यवसाय वाढीला चालना दिली. यामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज सह जागतिक पातळीवरील अनेक कंपन्यांनी आपल्या देशात मोठी गुंतवणूक केली. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली.
२००४ मध्ये पंतप्रधान म्हणून जबाबदारी स्वीकारत त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. महाराष्ट्रातील रोजगार हमीचा कायदा त्यांनी देशपातळीवर राबविला. मनमोहन सिंग व सोनिया गांधी यांनी यूपीए सरकारच्या काळात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णय यांचे जागतिक पातळीवर कौतुक देखील झाले.मी कृषिमंत्री असताना व विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना २००८ मध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी ७० हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केल्याची आठवण सांगत शेतकऱ्यांशी अत्यंत तळमळीने संवाद साधणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचा साधेपणा, स्वच्छ चरित्र, निगर्वीपणा हा देशवासीयांच्या कायम स्मरणात राहणारा असल्याचे थोरात म्हणाले.यावेळी हिरालाल पगडाल, बाळासाहेब गायकवाड यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शहर व तालुका काँग्रेस, महाविकास आघाडी, पुरोगामी संघटना आणि अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 614
आदरांजली बाळासाहेब थोरात मनमोहन सिंग श्रद्धांजली सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.